मंगळवार, ५ जुलै, २०१६

प्राचीन भारतीय संस्कृती

भारत : प्राचीन इतिहास 

प्राचीन भारतीय संस्कृती 

प्रागैतिहासिक कालखंड 

* भारतीय प्रागैतिहासिक कालखंड - इ.स.पु. सुमारे चार ते पाच लाख वर्षे.

* अश्म्युग - हत्यारे व अवजारे मुख्यतः दगडाची असल्यामुळे या कालखंडास अश्म्युग असे म्हणतात. अशमयुगाचे पुराणाश्मयुग व नावाष्मयुग असे म्हणतात.

* भारतीय नवाष्मयुग - इसवी सन आठ हजार ते दहा हजार सुमारे पाच हजार.

* प्रागतिहास - या संज्ञेचा प्रथम वापर वापर करणारा संशोधक डॅनियल विल्सन १८५१ हा आहे.

* भारतीय सर्वात प्राचीन हत्यारे जेथे सापडली ते स्थळ तामिळनाडू येथील पल्लवरम हे आहे.

* भारतीय अष्मयुगातील हत्यारे जेथे सापडली ते ठिकाणे कांग्रा व बेलन खोरे उत्तर प्रदेश, महेश्वर व राजपिल्ला मध्यप्रदेश, गुलेर पंजाब, नेवासे इनामगाव जोर्वे महाराष्ट्र, वडमदुरै तिन्नेवली तामिळनाडू, बिरभनपूर पश्चिम बंगाल, लंघनज गुजरात, ब्रह्मगिरी व जलहल्ली कर्नाटक, नागार्जुनकोंडा आंध्राप्रदेश.

* नवशमयुगाची विशेषतः - शेतीचा प्रारंभ झाल्यामुळे माणसाच्या अन्न व शिकार शोधण्याच्या भटक्या जीवनाची अखेर होऊन स्थिर जीवनाची वाटचाल, प्राण्यांना माणसाळवून पशुपालन व्यवसायाची सुरवात, स्थिर कुटुंब जीवनाची सुरवात, मातीची भांडी बनविण्यास सुरवात, धातूचा वापर, धर्मसंकल्पनाचा उदय.

* नवशमयुगातील धर्मकल्पना - सूर्य व पर्ज्यनाला महत्व, मातृदेवता व कुलदेवता यांची पूजा, धर्मगुरूंचा उदय, देवापुढे बळी देण्याची प्रथा.

* ताम्रपाषाणयुग - ज्या कालखण्डात दगडाची व तांब्याची हत्यारे अशा दोन्ही हत्यारांचा एकाच वेळी वापर सुरू होता, तो कालखंड म्हणजे ताम्र पाषाणयुग होय.

* भारतातील ताम्रपाषाणयुग - सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवी ३००० ते इसवी १७५०.

* भारतीय ताम्रयुग - इसवी २००० ते इसवी १८०० लहानसा कालखंड.

* भारतात तांब्याची हत्यारे, वस्तू जेथे सापडल्या ते प्रदेश - छोटा नागपूर व गंगा खोरे.

* ताम्र पाषाणयुग अवशेष भारतात ज्या राज्यात सापडले ती राज्ये - राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब.

* महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन स्थळे - नाशिक, जोर्वे, नेवासे, दायमाबाद, कोपरगाव, चणेगाव, उंब्रज.

  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.