मंगळवार, ५ जुलै, २०१६

वैदिकोत्तर कालखंड

वैदिकोत्तर कालखंड

बुद्ध कालखंड 

* बुद्धकालीन नगरे - चम्पा, श्रावस्ती, साकेत, राजगृह, कौसंबी, वाराणसी, कुशीनगर, वैशाली, चिरंद.

* बुद्धपूर्वकालीन व्यापारी मार्ग - श्रावस्ती ते राजगृह, श्रावस्ती ते प्रतिष्ठान, श्रावस्ती - सिंध, श्रावस्ती - तक्षशिला, श्रावस्ती - तक्षशिला - मध्य आशिया.

* बुद्धपूर्वकालीन प्रजासत्ताके - शाक्य, मल्ल, विदेह, लिच्छवी, कठ, मालव, यौधेय.

* बुद्धपूर्वकालीन सोळा महाजनपदे - अङग, मगध, वज्जी, काशी, कोसल, अवंती, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन, अष्मक, गांधार, कंबोज.

जैन धर्म : ६०० वे शतक 

* जैन धर्माची स्थापना ऋषभदेव यांनी केली. त्यांच्या पश्चात आणखी तेवीस तीर्थांकर झाले. शेवटचे तीर्थांकर वर्धमान महावीर हे चोविसावे तीर्थांकर आहेत. परंतु इतिहासानुसार वर्धमान महावीर यांनी जैन धर्माचे प्रवर्तन आणि प्रसार केला.

* वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सण ५३९ साली झाला, जन्मस्थळ कुंडग्राम कौंडिण्यपूर बिहार या ठिकाणी झाला.

* वडिलांचे नाव सिद्धार्थ व आईचे नाव त्रिशला उर्फ प्रियकारिणी. काठोर ज्ञानसाधनेद्वारे केवल ज्ञानची प्राप्ती.

* जैन धर्माचे वाडःमय - आगम ग्रंथ, जैन धर्मात अकरा अंगे, बारा उपांगे, सहा छेदसूत्रे, चार मूळसुत्रे, दहा चुलिकासुत्रे दहा प्रकीर्णके आहेत.

* जैन धर्माची पवित्र  स्थाने - श्रवणबेळगोळ कर्नाटक, दिलवाडा अबू पर्वत - राजस्थान, पावापुरी बिहार, शत्रूनंजय तीर्थ गुजरात, समेतशिखर तीर्थ बिहार, गिरनार तीर्थ गुजरात, चंपापुरी गुजरात, शंखेश्वर - गुजरात.

* जैन धर्माची पंचमहाव्रते - अहिंसा, सत्य, अस्त्येय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य.

* जैन धर्माची त्रिरत्ने - सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य.

* अन्य महत्वाचे विचार - वेदप्रामाण्याला नकार, निरीश्वरवाद, कर्मसिद्धांत, स्यादवाद, कोणत्याही बाबीला अनेक पैलू असतात.

* जैन धर्मातील प्रमुख पंथ - दिगंबर पंथ, शेतांबर पंथ.

* जैन चित्रकला - श्रावणबेळगोळ व मुडबिद्री येथील जैन मठातील हस्तलिखिते लघुचित्रे आढळतात.

* जैन लेणी - वेरूळ येथील जैन लेणी.

* जैन धर्माला आश्रय देणारे राज्यकर्ते - बिबीसार, अजातशत्रू, चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, अमोघवर्ष देवगिरी.

बौद्ध धर्म 

* भगवान बुद्ध यांचा जन्म इसवी सण पूर्व ५६७ ला झाला. जन्मस्थळ लुम्बिनी आहे, वडील शाक्यराजा शुशोधन व आई महामाया पत्नी यशोधरा आहे. पुत्र राहुल आहे.

* ज्ञानप्राप्ती - बोधगया, पिंपळ वृक्षाखाली बोधीवृक्षाखाली.

* भगवान बुद्धाचे पाहिले प्रवचन जेथे ते स्थळ - सारनाथ बनारसजवळ.

* निर्वाण - कुशीनगर येथे.

* चार आर्यसत्ये - दुःखमय जीवन, दुःखाचे कारण तृष्णा, तृष्णा नाहीशी करून दुःखाचे निराकरण, अष्टांग मार्ग हा दुःख निराकारणाचा मार्ग.

* अष्टांग मार्ग - सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्म, सम्यक जीवन, सम्यक व्यायाम, सम्यक चिंतन, सम्यक समाधी.

* त्रिरत्ने - प्रज्ञा, करुणा, शील.

* अन्य महत्वाचे विचार - कर्म सिद्धांत, जातीव्यवस्थेत विरोध, वेदप्रामाण्य व वैदिक कर्मकांडांना विरोध, ब्राह्मण पुरोहितांच्या श्रेष्ठत्वाच्या दाव्याला विरोध, ईश्वराच्या अस्तित्वाच्या भूमिका नाही.

* बौद्ध धर्माचे पवित्र वाडःमय - त्रिपिटक - विनयपिटक, सुत्तपिटक, व अभिधम्म पिटक, मिलिंदपन्ह जातककथा.

* बौद्धधर्माला आश्रय देणारे महत्वाचे राज्यकर्ते - सम्राट अशोक, राजा मिलिंद, मिलिंदपन्ह.

* भारताबाहेर बौद्ध धर्माचा जेथे प्रसार झाला असे देश व प्रदेश - मध्य आशिया, तिबेट, मंगोलिया, चीन जपान, कोरिया, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, श्रीलंका.

* बौद्ध वाङमय ज्या भाषेत लिहिले गेले त्या भाषा - पाली, प्राकृत, संस्कृत.

* बौद्ध गुहा शिल्पे - वेरूळ, अजिंठा, कार्ले, भाजे, कान्हेरी.

* प्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ - नालंदा विद्यापीठ.

* बौद्ध धर्मातील पंथ - महायान पंथ, हीनयान पंथ.

* बौद्ध धर्मानुसार मृत्यूनंतर जन्म मृत्यू पुनर्जन्म चक्रापासून मुक्त असलेली स्थिती - निर्वाण.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.