गुरुवार, २१ जुलै, २०१६

कर सहाय्यक सामान्य ज्ञान - सराव प्रश्न २

१] कृष्णजी प्रभाकर खाडिलकरांच्या नेपाळ योजनेत हे त्यांचे सहकारी होते?१] हनमंत अण्णाजी कुलकर्णी २] रंगनाथ गोविंद तिखे ३] दामू जोशी ४] बंडोपंत रुईकर

१] फक्त १ आणि ३
२] फक्त ३ आणि ४
३] फक्त १,२, आणि ४
४] वरील सर्व

२] शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला होता?
१] डॉ आंबेडकर
२] महात्मा फुले
३] महर्षी शिंदे
४] न्यायमूर्ती रानडे

३] १८५७ च्या उठावात
१] इनायतउल्ला खान, विलायत खान,नवाब कादर खान व दिदार खान यांना फाशी झाली.
२] बाबुराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली.
३] रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.

१] १,२ चूक ३ बरोबर
२] १ २ बरोबर ३ चूक
३] २ ३ चूक आणि १ बरोबर
४] २ ३ बरोबर १ चूक आहे.

४] पुढील घटना त्याच्या कालक्रमणांनुसार लावा.
१] गांधी इर्विन करार २] राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यू ३] दुसऱ्या जागतिक युद्धात जपानचा प्रवेश ४] रॉयल इंडियन नेव्हीत उठाव
१] १,४,३,२
२] १,२,३,४
३] १,४,२,३
४] १,३,४,२

५]  -- - - - - -  - हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु. के येथे इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला.
१] पांडुरंग महादेव बापट
२] अच्युत बळवंत कोल्हटकर
३] विष्णू गणेश पिंगळे
४] श्यामजी कृष्ण वर्मा

६] मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या कारिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते  - - - -  - - - या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.
१] महात्मा गांधी
२] मोरारजी देसाई
३] सरदार पटेल
४] डॉ वर्गीस कुरियन

७] मिस लिट्ल यांच्यानंतर शाहू महाराजांनी - - - - - - - - - यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली.
१] इंदुमती राणीसाहेब
२] श्रीमंत रखमाबाईं केळवकर
३] ताराबाई शिंदे
४] पंडिता रमाबाई

८] आधुनिक भारतातील इतिहासातील शेतकऱ्यांचे सर्वात मोठे गनिमी युद्ध कोणते होते?
१] किसान सभा आंदोलन
२] मोपला उठाव
३] दख्खन दंगे
४] तेलंगणा आंदोलन

९] बेगम एजाज रसूल, हंसा मेहता, आणि रेणुका रॉय यांच्यात कोणती गोष्ट समान आहे?
१] त्यांनी राज्यघटना गांधीवादी नसल्याची टीका केली.
२] त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली.
३] त्या घटना समितीच्या सदस्या होत्या.
४] त्यांनी समतेच्या दिशेने हा स्त्री मुक्तीविषयक अहवाल लिहिला.

१०] चुकीची जोडी ओळखा?
१] प्रोग्रेसिव्ह वूमन्स ऑर्गनायझेशन - हैद्राबाद
२] पुरोगामी स्त्री संघटना - पुणे
३] स्त्री - मुक्ती संघटना - मुंबई
४] महिला दक्षता समिती - कोलकाता

११] खालील गुणधर्म कोणत्या मृदेचे आहेत?
१] आद्र हवामान असलेल्या प्रदेशात आढळते.
२] पर्जन्य जास्त असलेल्या प्रदेशात आढळते.
३] सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
४] अल्युमिनियम आणि मॅगनीज यांची संयुगे आढळतात.

१] रेगूर मृदा
२] तांबडी मृदा
३] जांभी मृदा
४] वाळू मिश्रित मृदा

१२] खालील विधाने पहा.
१] कोकण विभागात ९४% पाऊस आग्नेय मोसमी वाऱ्यापासून पडतो.
२] उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो.
३] पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो.

१] फक्त १ बरोबर
२] फक्त २ बरोबर
३] फक्त १ आणि २ बरोबर
४] विधाने २ आणि ३ बरोबर

१३] खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत?
१] सह्यांद्री पर्वताच्या वातसन्मुख उतारावर पर्जन्याचे प्रमाण कमी असते.
२] अंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो.
३] महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी भागापासून मोसमी वाऱ्यापासून पडतो.
१] फक्त १
२] फक्त २
३] फक्त ३
४] फक्त १ आणि ३

१४] महाराष्ट्र २०११ जनगणनेच्याप्रमाणे कमी साक्षरतेचे शेवटचे दोन जिल्हे कोणते आहेत?
१] गडचिरोली आणि धुळे
२] धुळे व नंदुरबार
३] हिंगोली व धुळे
४] नंदुरबार व गडचिरोली

१५] खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात.
१] परभणी व रत्नागिरी २] धुळे व सोलापूर ३] गडचिरोली व अमरावती ४] अहमदनगर व पुणे

१] फक्त २
२] फक्त १ आणि २
३] फक्त २ आणि ४
४] फक्त १, २, ३

१६] योग्य जोड्या लावा.
१] फोंडा घाट   १] कोल्हापूर - रत्नागिरी
२] दिवा घाट     २] पुणे - बारामती
३] आंबा घाट    ३] पुणे - सातारा
४] खंबाटकी घाट  ४] कोल्हापूर - पणजी

१] ३,२,१,४
२] ४,२,१,३
३] ४,१,२,३
४] ३,२,४,१

१७] सन २०१४ पर्यंत महाराष्ट्रात कोणत्या विभागात विशेष आर्थिक क्षेत्र [SEZ] स्थापन झाले नाही.
१] कोकण
२] औरंगाबाद
३] नाशिक
४] नागपूर

१८] सर्वसाधारणपणे उंची वाटण्याबरोबर तापमानात घट होते, हे कोणत्या विभागाच्या वातावरणात आढळून येते.?
१] तपांबर
२] दलांबर
३] स्थितांबर
४] बाह्यंबर

१९] योग्य जोड्या लावा.
१] जोरदार वारा  १] लॅब्राडोर
२] थंड समुद्र वारा  २] गरजणारे चाळीस
३] उष्ण समुद्र प्रवाह  ३] जेट प्रवाह
४] पश्चिमी वारे  ४] एल निनो
१] 2,4,1,3
2] 3,1,4,2
3] 1,2,3,4
4] 3,2,1,4

20] महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील विधाने पहा?
१] जिल्हा परिषदा ३४ आहेत. २] नगर परिषदा २२६ आहेत. ३] महानगरपालिका २५ आहेत.

१] फक्त १ बरोबर
२] फक्त १ व २ बरोबर
३] विधाने १,२,३ बरोबर आहे.
४] विधाने २ आणि ३ बरोबर आहेत.

२१] समानतेच्या अधिकाराशी संबंधित जोड्या लावा.
१] १४   १] पदव्यांची समाप्ती
२] १६   २] कायद्यासमोर समानता
३] १७   ३] अस्पृश्यता निवारण
४] १८   ४] सार्वजनिक नोकरीबाबत समान संधी
१] २,४,१,३
२] २,४,३,१
३] १,३,२,४
४] ४,२,३,१

२२] योग्य जोड्या लावा.
१] प्रस्तावना व उद्देशपत्रिका   १] आयरिश राज्यघटना
२] एकेरी नागरिकत्वाची पद्धत २] कॅनडियन राज्यघटना
३] प्रबळ केंद्र्युक्त संघराज्य     ३] अमेरिका राज्यघटना
४] राष्ट्रपतीची राज्यघटना       ४] यु. के. राज्यघटना
१] १,२,३,४, २] २,४,१,३ ३] ३,४,२,१ ४] ४,३,१,२

२३] पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम - - - - - - - या व त्यानंतर - - - - - - या राज्यात झाली.
१] राजस्थान व मध्यप्रदेश
२] आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल
३] राजस्थान व आंध्र प्रदेश
४] आंध्रप्रदेश आणि राजस्थान

२४] जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून भूमिका बजावतो, खालीलपैकी कोणत्या जबाबदाऱ्या त्यास पार पाडाव्या लागतात?
१] जिल्ह्याचा प्रशासकीय अधिकारी २] जिल्हा महसूल अधिकारी ३] जिल्हा दंडाधिकारी ४] जिल्हा निर्वाचन अधिकारी
५] शासनाचा जिल्हा प्रतिनिधी

१] १ ते ५ सर्व
२] फक्त २,३,४
३] फक्त १,३,४
४] फक्त १ ते ४

२५] ग्रामसभेचे सद्यस्य कोण असतात?
१] ग्राम पंचायतीचे निवडून आलेले सदस्य
२] १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्ती
३] गावातील नोंदणी झालेले मतदार
४] सरपंच, उपसरपंच, व ग्राम पंचायतीचे निवडून आलेले सर्व सदस्य.

२६] भारतात आर्थिक व्यवहारासंबंधी मुद्रांक शुल्क हे १] राज्य सरकारद्वारे आकारले व गोळा केले जाते २] त्याचा विनियोग केंद्राद्वारे केला जातो. [ वरील योग्य विधाने कोणते ]
१] १ व २ दोन्ही
२] १ व २ दोन्ही नाही
३] फक्त १ बरोबर
४] फक्त २ बरोबर

२७] योग्य जोड्या लावा.
१] आसाम   १] स्वतंत्र विकास मंडळे स्थापण्याबाबत
२] मणिपूर    २] जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाबाबत
३] नागालँड  ३] राज्यातील डोंगरी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत
४] महाराष्ट्र   ४] राज्यातील कायदा व सुव्यवस्था

१] २,३,४,१
२] ४,३,२,१
३] १,२,३,४
४] १,३,४,२

२८] मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये यापैकी कोणते विधाने बरोबर नाही?
१] राज्यपाल राज्याच्या प्रशासनसंबंधी अथवा विधिनियमांच्या प्रस्तावासंबंधी जी माहिती मागवतील ती ते देतात.
२] ते राज्याचे मंत्री आणि राज्यपाल यामधील संपर्काचा एकमेव मार्ग म्हणून कार्यरत असतात.
३] ते एखादया मंत्र्यांस राजीनामा देण्यास सांगू शकतात अथवा ते त्या मंत्र्यांस बडतर्फ करू शकतात.
४] घटनात्मकदृष्टया विधिमंडळ सद्यस्य नसणाऱ्यास मुख्यमंत्री बनण्यात कोणताही अडथळा नाही.

२९] खालील अचूक विधान कोणते?
 १] मार्गदर्शक तत्वे आयरिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत.
२] या सर तत्वांचे स्वरूप गांधीवादी आहेत.
३] हि तत्वे घटनेच्या ५ व्या भागात समाविष्ट आहेत.
४] या तवांची अंमलबजावणी राज्यावर बंधनकारक आहे.
५] लोकशाहीचा सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

१] १ व ५
२] १,३, व ५
३] १, २, ३, व ५
४] वरील सर्व

३०] राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत?
१] राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती असते.
२] राज्यपालपदासाठी वयाची ३५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते.
३] राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकते.
४] राज्यपालास पदावरून बडतर्फ करण्याबाबतची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे.

१] १, २, ४
२] १, २, ३,
३] १, ३, ४
४] १, २, ३, ४

३१] खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश नव्याने राज्यघटनेत घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे?
१] समान न्याय व कायदेविषयक मोफत सल्ला.
२] समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन
३] उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
४] पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने जीवसृष्टीचे रक्षण करणे.

१] १,२,३
२] २,३,४
३] २ आणि ४
४] १, ३, ४


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.