बुधवार, ६ जुलै, २०१६

विजयनगरचे हिंदू साम्राज्य

विजयनगरचे हिंदू साम्राज्य 

* विजयनगरच्या स्वतंत्र हिंदू राज्याचे संस्थापक - हरिहर व बुक्क.

* विजयनगरचे महत्वाचे राजे - हरिहर, बुक्क, दुसरा देवराय, कृष्णदेवराय.

* विजयनगरच्या ताब्यातील मुलुख - तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील सर्व प्रदेश.

* हरिहर व बुक्क यांचे गुरु - विद्यारण्यस्वामी.

* विजयनगर विषयी काही माहिती देणारे परदेशी प्रवासी - इटालियन - निकोलो द कोन्ती, लुडोविको, बार्थेमा, सीझर, फेडिरकी, रशियन - अथेनेशियास निकितन, पर्शियन - अबदूरजक, पोर्तुगीज - दुआर्ते, बार्बोस, डोमिंगो पेस, फेर्नांव नुनीझ.

* विजयनगरच्या राजधान्या - विजयनगर, पेनुकोंडा, चंद्रगिरी, पेनुकोंडा व चंद्रगिरी.

* विजयनगरचा शेवटचा राजा - सदाशिवराव.

* विजयनगरचा शेवट करण्यासाठी एकत्रित आलेल्या बहामनी सत्ता - अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा.

* विजयनगरचा शेवट करणारी लढाई - तालिकोटची लढाई.

* तालिकोटच्या लढाईच्या वेळेचा विजयनगरचा सेनापती - रामराया.

* विजयनगरकालीन मुख्य बंदरे - कालिकत, अंकोला, होनावर, भटकळ.

* विजयनगरकालीन सांस्कृतिक जीवन - रत्नाकरपरनीकृत भारती वैभव, नंदीमल्लया व घंटसिंगय्या यांचे वराहपुराण, अष्टदिग्गज उर्फ आठ महान तेलगू कवी - तेनाली रामकृष्ण, रामराज भूषण यांचे लेखन.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.