बुधवार, ६ जुलै, २०१६

मराठा कालखंड

मराठा कालखंड

भोसले राजवंश 

* भोसले राजवंशाचा मूळ पुरुष संस्थापक - बाबाजीराजे भोसले.

* बाबाजीराजे यांचे पुत्र - मालोजीराजे, विठोजीराजे.

* मालोजीराजे यांचे पुत्र - शहाजीराजे, व शरीफजीराजे [ माता - उमाबाई ].

* विठोजीराजे यांचे पुत्र - संभाजीराजे, खेळोजीराजे, मालोजीराजे, मंबाजीराजे, नाणोजीराजे, परसोजीराजे, त्रयंबकजीराजे व कक्कोजीराजे. [ माता - जिजाबाई ].

* शहाजीराजे यांचे पुत्र - संभाजीराजे व शिवाजीराजे [ माता - जिजाबाई ], व एकोजी उर्फ व्यंकोजी [ माता - तुकाबाई ].

शहाजी राजे भोसले 

* मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे हे मोठे पराक्रमी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व होते. ते विजापूर अहमदनगर या शाह्यांत सरदार होते.

* महाराष्ट्रातील इंदापूर, सुपे, पुणे, चाकण, आणि महाराष्ट्राबाहेरील बंगळूर, व वेलोर हे प्रदेश शहाजीराज्यांच्या ताब्यात होते.

* दादाजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, शामराव नीलकंठ, कान्होजी जेधे यासारखे निष्ठवंत सेवक शहाजीराजांनी बंगळूरहून महाराष्ट्रात पाठविले.

* कर्नाटकातील होदेगिरी येथील जंगलात शिकारीला गेले असता शहाजीराजांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. होदेगिरी येथे त्यांची समाधी आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.