शुक्रवार, २९ जुलै, २०१६

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारासाठी आधार क्रमांक आवश्यक - २०१६

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारासाठी आधार क्रमांक आवश्यक - २०१६

* पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा चाळणी परीक्षा व मुलाखत अशा निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, उमेदवाराची ओळख पटविणे ही एक महत्वाची बाब आहे. हे विचारात घेता उमेदवारांच्या अर्जात त्यांनी त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

* प्राप्त माहितीवरून दिसून येते कि १८ वर्षावरील ९५% पेक्षा अधिक व्यक्तीकडे सध्या आधार कार्ड क्रमांक आहे. त्यामुळे उमेदवाराची ओळख पटविण्यासाठी आधार क्रमांकाचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो.

* यासाठी आयोगाने निर्णय घेतला कि १५ ऑगस्ट २०१० पासून येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारानी अर्ज भरताना त्यांचा आधार क्रमांक नमूद करणे आवश्यक राहील.

* तसेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, चाळणी परीक्षा, मुलाखत अशा विविध टप्प्यावर आयोग निश्चित करेल त्यानुसार उमेदवारांनी त्यांचे मूळ आधार कार्ड दाखविणे व त्याची साक्षांकित प्रत दाखविणे आवश्यक राहील.

* तसेच ज्यांनी अद्याप आधार क्रमांक मिळवले नसेल त्यांनी पुढील तीन महिन्यात ते प्राप्त करून घ्यावे. ज्यामुळे त्यांनीही गैरसोय टाळणार.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.