शुक्रवार, २९ जुलै, २०१६

भौगोलिक निर्देशांक २०१६

भौगोलिक निर्देशांक २०१६

* जळगावची केळी, मराठवाड्यातील केसर आंबा, भिवापूर [नंदुरबार] मिरची, डहाणू घोलवडचा [पालघर] चिकू, आणि आंबेमोहोर तांदूळ  पुणे, यांना भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत.

* यापूर्वी १८ शेतमालास [GI] भौगोलिक निर्देशांक मिळाले असून, एकूण २३ [GI] मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे.

* यापूर्वी सोलापुरी डाळींब, नाशिकची द्राक्ष, वायगावची हळद, मंगळवेढ्याची ज्वारी, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा कोकम, कोरेगावचा वाघ्या घेवडा, नावापूरची तूरडाळ, वेंगुर्ल्याचा काजू, लासलगावचा कांदा, सांगलीचे बेदाणे, बीडची सीताफळे, जालन्याची मोसंबी, जळगावची भरताची वांगे, पुरंदरचे अंजीर, कोल्हापूरचा गूळ, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नागपुरी संत्री, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ, यांना GI मिळाला आहे.

* देशात GI मिळवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे तरीही सांगलीची हळद, रत्नगिरी व देवगडचा हापूस, सोलापूरची चटणी, कोल्हापुरी मसाला, यांना भौगोलिक निर्देशांक मिळवण्यासाठी प्रस्ताव प्रलंबित आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.