रविवार, २४ जुलै, २०१६

चालू घडामोडी २० ते २४ जुलै २०१६

चालू घडामोडी २० ते २४ जुलै २०१६

* सरकारी सर्वेनुसार देशात सर्वाधिक इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तामिळनाडू राज्यात आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र व दिल्ली या राज्याचा क्रमांक लागतो.

* आंतरराष्ट्रीय स्तरावरील ' मिस्टर वर्ल्ड ' हा किताब हैद्राबादच्या रोहित खंडेलवाल यांच्या रूपाने यावर्षी पहिल्यांदाच भारतीयाने पटकावला आहे.

* या स्पर्धेत जगभरातील एकूण ४७ स्पर्धक उपस्थित असून रोहितची यात निवड झाली आणि त्याला ५० हजार डॉलरचे बक्षीस देण्यात आले.

* जेएनपीटी अंतर्गत येणारे बंदर व चार वर्षात नव्याने येणारे बंदर यासाठी जेएनपीटी पोर्ट रोडची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात जेएनपीटी हे बंदर देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून नावारूपाला येणार आहे.

* तसेच बंदरातून सुलभपणे मालाची वाहतूक करण्यासाठी चौपदरी ते आठपदरी रस्ते करण्यात येणार आहेत.

* परदेशात वेस्टइंडीज विरुद्ध चालू असलेल्या कसोटी क्रिकेट मध्ये विराट कोहलीने द्विशतक केले असून त्यामुळे परदेशात द्विशतक करणारा एकमेव भारतीय कर्णधार तो ठरला आहे.

* देशाच्या करप्रणालीत ऐतिहासिक बदल घडून आणणारे वस्तू व सेवा विधेयक अर्थात GST हे बिल या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत चर्चा होऊन संमत होऊ शकते या आधी लोकसभेत हे बिल यापूर्वीच संमत झाले आहे.

* युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंदीगड, सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष या तीन स्थळांचा समावेश आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.