मंगळवार, १९ जुलै, २०१६

कर सहाय्यक सराव प्रश्नपत्रिका - १


१] पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दास समानार्थी नाही?
१] अवनी २] क्षमा ३] दारा ४] वसुंधरा

२] लढाऊ या धातुसाधितांची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे?
१] ऊ - योग्यतादर्शक २] आऊ - योग्यतादर्शक ३] प्रत्यय जोडलेला नाही ४] शून्य प्रत्यय

३] दिलेल्या शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा?
१] गार २] किनारा ३] आधात ४] गर्दी

४] पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते कोणती, ते ओळखा?
१] राघव, सौभद्र, कायीक, उत्कंठीत, २] नवीन, राजकीय, जडत्व, श्रीमान ३] लौकिक, आनंदित, कुलीन, महत्व ४] भरडा, मातकट, शेतकी, भोळसर

५] पुनरावृत्ती हा संधी कसा सोडविला जाईल?
१] पुन: + रावृत्ती २] पुनर + आवृत्ती ३] पुनः + वृत्ती ४] पुनर + वृत्ती

६] दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय शोधा?
१] वाक्पती २] सदाचार ३] सन्मती ४] गुरूपदेश

७] दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा? [ तिचे गाणे गाऊन झाले. ]
१] समापन कर्मणी २] नवीन कर्मणी ३] शक्य कर्मणी ४] पुरुष कर्मणी

८] तू मला खूप मदत केलीस, या वाक्यातील प्रयोग कोणता?
१] कर्तू - कर्म संकर २] कर्म - भाव संकर ३] कर्तू - भाव संकर ४] कर्मणी

९] पुढीलपैकी लिंगविचार वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?
१] सुंदर २] कडू ३] रानटी ४] शहाणा

१०] परिणामबोधक संयुक्त वाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो?
१] म्हणून, सबब २] अथवा, किंवा ३] परि, पण ४] व, आणि

११] समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामूहिक स्वरूपाचे कार्य आहे, या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल?
१] समाजात परिवर्तन घडवून आणणे हे सामूहिक स्वरूपाचे कार्य नाही. २] समाजात परिवर्तन घडवून आणणे हे वैयक्तिक स्वरूपाचे कार्य नाही. ३] समाजात परिवर्तन न घडवणे आणणे हे सामूहिक स्वरूपाचे कार्य आहे. ४] समाजात परिवर्तन घडू न देणे हे सामूहिक स्वरूपाचे कार्य आहे.

१२] योग्य जोड्या जुळवा
अ] वाट धरणे    १] लुटणे
ब] वाट मारणे    २] निकालात राहणे
क] वाट लागणे  ३] रहदारी असणे
ड] वाट वाहणे   ४] प्रतिबंध करणे
१] ३, ४, २, १, २] ४, १, २, ३ ३] १, ४, ३, २ ४] ३, ४, १, २

१३] पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता?
१] खुळा २] कोवळा ३] काम ४] घाम

१४] खालील जोडशब्दातील पर्यायी उत्तरातील कोणत्या पोटशब्दाचे उत्तर बरोबर आहे? [ वाक्पती ]
१] वाक + पती २] वाङ + पती ३] वाग + पती ४] वाद् + पती

१५] पुढे अनल या शब्दाचे समानार्थी शब्द दिले आहेत. त्यातील अचूक शब्द ओळखा?
१] विस्तव, पादप, अग्नी, वन्ही २] पावक, तडाक, विस्तव, अग्नी ३] अग्नी, वायस, वन्ही, विस्तव ४] विस्तव, पावक, अग्नी, वन्ही

१६] जगाचे नियंत्रण करणारा या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात येतो?
१] जगन्नायक २] जगन्नियता ३] जगन्नाथ ४] जगतकर्ता

१७] दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा?
१] पिता २] सासू ३] खुळा ४] रेडा

१८] पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
१] ओसरी, डोंगर, उतरंड २] मठ, शेत, तेल ३] आंगण, देऊळ, कणिक ४] हाट, गुंडा, गुडघा

१९] पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा?
१] क २] र ३] थ ४] म

२०] या कृत्याबद्दल आम्ही जेथे जमलेले सर्व लोक आपले मन:पूर्वक अभिनंदन करतो, या वाक्यातील कर्म ओळखा?
१] येथे जमलेले सर्व लोक २] आपले अभिनंदन ३] या कृत्याबद्दल मन:पूर्वक ४] आम्ही येथे जमलेले

२१] दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा? [ आज्ञेबरहुकूम ]
१] हेतूवाचक २] योग्यतावाचक ३] संबंधवाचक ४] भागवाचक

२२] पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?
१] मी आत्ताच नगरहून आलो २] आमची बेबी आता कॉलेजात जाते ३] माधुरी उद्या मुंबईला जाईल ४] शेजारची तारा यंदा बी ए झाली

२३] शंकर महादेवन अप्रतिम गाणी गातात, या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कशा प्रकारे होईल?
१] शंकर महादेवन अप्रतिम गायले.
२] शंकर महादेवन यांनी अप्रतिम गाणी गायली.
३] शंकर महादेवन अप्रतिम गाणी गात आहेत.
४] वरील पैकी एकही नाही.

२४] पर्यायी उत्तरातील अवधीवाचक कालवाचक क्रियाविशेषण कोणते?
१] दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली २] पक्षीण क्षणोक्षणी पडत होती ३] नेहमी त्यांचे अस्सेच असते ४] तो कैकवेळा सांगूनही आला नाही

२५] खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे?
१] र्हस्व स्वर २] दिर्घ स्वर ३] संयुक्त स्वर ४] स्वरादी

२६] जोड्यांचा योग्य पर्याय निवडा.
अ] अश्व          १] दुर्जन
ब] खल            २] भुजंग
क] अहण         ३] हय
ड] अही           ४] दिवस

१] ४,१,३,२ २] २,३,१,४ ३] ३,१,४,२ ४] १, ३, २, ४

२७] आजन्म, आमरण, आकर्ण, या शब्दामध्ये आलेला उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या अर्थासाठी उपयोगात येत नाही?
१] पूर्वी २] पासून ३] पर्यंत ४] पलीकडे

२८] पुढे मराठी प्रत्यय  त्यापासून बनलेली धातुसाधिते दिली आहेत, त्यातील योग्य पर्याय निवडा?
१] घडाई, झगडा, विसराळू, पाळीव २] लेखक, वदन, रमणीय, पथिक ३] पाचक, तुलना, श्रवणीय, श्रोता ४] भवितव्य, रसिक, पालन, गायक

२९] पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत अपभ्रंश रुपाबरोबर मूळ तत्सम रूपात वापरात येऊ लागले?
१] काज, हिय्या, रान २] मेघ, कथा, धर्म ३] चिखल, झाड, पेंढी ४] मधुर, इमान, अर्ज

३०] दिलेल्या पर्यातुन स्पर्श व्यंजन ओळखा?
१] ध २] य ३] ल ४] व

३१] दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? [ आईने मुलीला लाडू दिला ]
१] अकर्मक क्रियापद २] उभयविध क्रियापद ३] व्दिकर्मक क्रियापद ४] विधानपूरक

३२] शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली, ते स्थान अजूनही दाखवण्यात येते. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
१] मिश्र वाक्य २] समुच्चयबोधक संयुक्त वाक्य ३] परिणामबोधक संयुक्त वाक्य ४] केवल वाक्य

३३] न्यूनत्वबोधक संयुक्तवाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो?
१] आणि, व २] अथवा, किंवा ३] पण, परंतु ४] म्हणून, सबब

३४] कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
१] भूमी २] विपीन ३] अरण्य ४] जंगल

३५] संस्कृतमधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा?
१] आडवळण, अदकोस, अबोल, निनावी २] पडताळा, फटकळ, भरधाव, अवकळा ३] निलाजरा, अवघड, पडसाद, अदपाव ४] अभिनय, अवमान, अनुभव, अतिरेक


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.