बुधवार, ६ जुलै, २०१६

उत्तरेकडील चोल राजवंश

उत्तरेकडील चोल राजवंश 

* स्वतंत्र चोल सत्तेचा संस्थापक - विजयलय चोल.

* प्रमुख चोल राजे - पहिला राजराज चोल व पहिला राजेंद्र चोल.

* चोल सत्तेच्या ताब्यातील प्रदेश - तुंगभद्रेच्या ताब्यातील मुलुख, तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील भारत, श्रीलंका, लक्षद्वीप बेटे, मालदीव बेटे.

* मालदीव बेटांच्या चोलकालीन वर्णन - बारा हजार प्राचीन बेटे.

* पहिला राजराज चोल - चोल नाविक सत्तेचा संस्थापक, श्रीलंका व मालदीव बेटे जिंकली, तंजावरच्या प्रख्यात राजराजेश्वर किंवा बृहदेश्वर मंदिराचे बांधकाम.

* पहिला राजेंद्र चोल - श्रीलंका रायचूर दोआब कर्नाटक किनारी भाग, आंध्रचा काही भाग व ओरिसा जिंकले. आग्नेय आशियात नाविक मोहीम काढून मलाया, सुमात्रा, येथे विजय मिळवले.

* पहिल्या राजेंद्र चोलची राजधानी - कावेरीच्या मुखाजवळ गंगईकोंड चोलपुरम गंगाविजयी चोलाचे नगर.

* चोल सत्तेची वैशिष्ट्ये - नाविक सत्ता, समुद्रपार विजय, द्रविड शैलीतील मंदिराचे बांधकाम, प्रशासनात प्रांत, जिल्हा ग्राम पातळ्यांवर स्वायत्त प्रतिनिधी सभा.

* चोलांच्या राजधान्या - तंजावर, गंगईकोंड चोलपूरम.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.