सोमवार, १८ जुलै, २०१६

चालू घडामोडी ११ ते १८ जुलै - २०१६

चालू घडामोडी ११ ते १८ जुलै  - २०१६

* डेव्हिड कॅमेरून यांनी ब्रिटनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या जागी आता थेरेसा मा ह्या नवीन पंतप्रधान असतील.

* अँपल आणि अँड्रॉइड या यावरून अँप डाउनलोड करण्यावर व खरेदी करण्यावर कर लावण्यात येणार आहे त्यामुळे हे सर्व अँप महाग होण्याची शक्यता आहे.

* ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील काही कंपन्यांचे सर्वेक्षण केले असून त्यानुसार भारतातील कंपन्या अधिक पारदर्शी बनल्या आहेत. त्यात भारतातील भारती एयरटेल ही कंपनी सर्वात जास्त पारदर्शक आहे.

* ऐस अगेन्स्ट ऑड्स या आत्मचरित्राचे सानिया मिर्झा या भारतीय टेनिसपटूने प्रकाशन केले आहे. या आत्मचरित्रात तिने आपल्या कारकिर्दीचे क्षण व आठवणी मांडल्या आहेत.

* युरो चषक करंडक स्पर्धेत पोर्तुगॉलने फ्रान्सवर विजय मिळवून कप आपल्या नावावर केला पोर्तुगॉल ने पहिल्यांदाच हा चषक आपल्या नावावर केला.

* सरकारने आपल्या स्वच्छ भारत या अभियानाच्या जाहिरातीसाठी प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांची निवड केली असून, त्यांना या अभियानाचे महत्व पटवून सांगावे लागेल.

* संयुक्त राष्ट्र संघटनेने १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.