मंगळवार, ५ जुलै, २०१६

मौर्य साम्राज्य

मौर्य साम्राज्य 

* मौर्य साम्राज्याचा संस्थापक - चंद्रगुप्त मौर्य

* मगधमधील नंद सत्तेचे पारिपत्य करण्यात चंद्रगुप्त मौर्याला मदत करणारी व्यक्ती - आर्य चाणक्य कौटिल्य.

* चंद्रगुप्त मौर्याने ज्याचे पारिपत्य केले तो नंद सम्राट - धननंद

* मौर्य साम्राज्याची राजधानी - पाटलीपुत्र

* चंद्रगुप्त मौर्याने पराभूत केलेला ग्रीक सेनापती - सेल्युकस निकेटर

* बँक्रीटयाचा ग्रीक राजा सेल्युकस निकेटर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवलेला वकील - मेगस्थेनीस

* मेगस्थेनीसकृत भारत वर्णन - इंडिका.

* कौटिल्यलिखित शासनव्यवस्थेवरील अजोड ग्रंथ - अर्थशास्त्र.

* चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र व वारसदार - बिंदुसार

* बिंदुसारपुत्र व वारसदार - सम्राट अशोक.

* सम्राट अशोक ज्या लढाईतील विजयानंतर सम्राट अशोकाने युद्धत्याग केला व बौद्ध धर्म स्वीकारला ती लढाई - कलिंगची लढाई.

* सम्राट अशोकाने बौद्ध धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठविलेला आपला मुलगा व मुलगी - महेंद्र व संघमित्रा.

* सम्राट अशोकाच्या कोरीव लेखांची लिपी - मुख्यतः खरोष्टी लिपी व ब्राम्ही लिपी, वायव्य भागात अरेमिक लिपी.

* सम्राट अशोकाचे शिलालेख जेथे सापडले ती स्थाने - शहबाझगढी व मनशेरा पेशावरजवळ, कलसी उत्तर प्रदेश, गिरनार गुजरात, सोपारा - महाराष्ट्र.

* सम्राट अशोकाचे स्तंभालेख जेथे सापडले ती स्थाने - रुमिनिडी नेपाळ, सारनाथ - उत्तर प्रदेश, सांची - मध्य प्रदेश.

* सम्राट अशोकाने भारतातील ज्या राज्यकर्त्याबरोबर मैत्रीचे संबंध जोपासले ते काही राज्यकर्ते - अँटीओकस सिरिया, टॉलेमी - फिलाडेल्फिया इजिप्त, अँन्टीगोनस, तिस्स.

* सम्राट अशोकाचा पुत्र व वारसदार - कुणाल

* शेवटचा मौर्य सम्राट - बृहद्रथ

* मौर्य साम्राज्यनंतरचे परकीय आक्रमक - कुशाण, शक, ब्यट्रिक ग्रीक, पार्थियन्स.

* महत्वाच्या कुशाण सम्राट - कनिष्क याला दुसरा अशोक असेही म्हणतात.

* कुशाण सम्राट कनिष्कची राजधानी - पुरुषकार

* कनिष्काचे साम्राज्य - वायव्येस खोतान ते पूर्वेस बिहार व दक्षिणेस अपरांत कोकण पर्यंत सम्राट कनिष्क आश्रय लाभलेले विद्वान - वसुमित्र, नागार्जुन, अश्वघोष, चरक.

* कनिष्ककालीन - प्रख्यात शिल्पशैली - गांधारशैली.

* कुशाण राज्यकर्ते - पहिला कॅंडफिलस, दुसरा कँडफिसस, कनिष्क, हुविष्क.

* मौर्यकालीन सुदर्शन तलावाची दुरुस्ती करणारा शकसम्राट - रुद्रदामन.

* शुंग राजवंशाचा संस्थापक - पुष्पमित्र शुंग

* बक्ट्रियन ग्रीक राजा डिमीट्रीयस याचा पराभव करणारा शुंग राजा - वसुमित्र.  0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.