बुधवार, ६ जुलै, २०१६

मोघल कालखंड

मोघल कालखंड 

* मोघल सत्ता स्थापन होण्यापूर्वी भारतात अस्तित्त्वात असलेली स्वतंत्र राज्ये व सत्ता - काश्मीर, पंजाब, सिंध, राजपूत, गुजरात, माळवा, खान्देश, बंगाल, विजयनगर, बहामनी राज्ये, विजापूर, वऱ्हाड गोवळकोंडा.

* मोघल सत्तेचा संस्थापक - जाहिरउद्दीन मुहंमद बाबर.

* बाबर - मूळ स्थान मध्य आशियातील फरघना समर कंद, पानिपतच्या पहिल्या लढाईत सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने दिल्लीची सत्ता संपादन केली.

* बाबरने पराभूत केलेला राजपूत - राणा संग.

* हुमायून - अयशस्वी मोगल सम्राट. शेरशहाकडून पराभूत, विजन वासात हुमायुनला आश्रय देणारा देश व त्याचा सम्राट तहमास्प.

* दिल्लीचा अफगाण सुलतान शेरशहा सुरी - शेरशहा हुमायून पराभूत करून दिल्लीत अफगाण सत्तेचे पुनराजीवन केले, वैशिट्यपूर्ण जमीन महसूल व्यवस्था. चांदीचा रुपया या चलनाची सुरवात. सोनारगाव ते सिंधू नदी, आग्रा - जोधपूर, आग्रा - बऱ्हाणपूर, लाहोर - मुलतान या महामार्गाची बांधणी.

* हेमू - दिल्लीचा शेवटचा सुरवंशीय सुलतान मुहमंद आदिलशाही याचा पंतप्रधान, हेमूने अल्पकाळ दिल्लीत सत्ता बळकावून हिंदू सत्तेचे पुनरजीवन केले, महाराजा विक्रमादित्य हे नाव धारण केले, दुसऱ्या पानिपतच्या लढाईत मोगलांकडून हेमूचा पराभव व मोगल सत्तेचे दिल्लीत पूणर्जीवन झाले.

* अकबर - मोगल सत्तेचे साम्राज्यात रूपांतर, राजपुताबाबत उदार धोरण, हिंदू बाबत सहिष्णू धार्मिक धोरण.

* अकबराशी वसवलेली राजधानी - फत्तेपुर सिक्री.

* अकबराशी सलोखा करणारी रजपूत राज्ये - जयपूर, जोधपूर, बिकानेर, जैसलमेर.

* अकबराचे वर्चस्व नाकारणारा व त्याच्याशी शेवटपर्यंत झुंजणारा राजपूत राजा - उदयपूरचा महाराणा प्रताप.

* राणा प्रताप मोगलांकडून ज्या लढाईत पराभूत झाला ती लढाई - हळदीघाटची लढाई.

* अकबराच्या कारकिर्दीत मोगल सत्तेविरुद्ध लढलेली लढाई - हळदीघाटची लढाई.

* अकबराच्या कारकिर्दीत मोगल सत्तेविरुद्ध लढलेली पण पराभूत झालेली गोंडवनची राणी - राणी दुर्गावती.

* अकबराने स्थापन केलेला पंथ - दिन -इ-इलाही आहे.

* अकबराच्या दरबारातील नवरत्ने - बहरामखान, राजा मानसिंग, अबुल फजल, मुल्ला दोप्याजा, राजा तोडरमल, राजा बिरबल, तानसेन, हकीम हुमाम, बदाऊनी.

* अकबराची लष्करी व्यवस्थापनाची पद्धत - मनसबदारी पद्धत.

* अकबरकालीन नाणी - मुख्य नाणे - चांदीचा रुपया, सोन्याची २६ प्रकारची नाणी, तांब्याचे मुख्य नाणे.

* अकबराचे धार्मिक धोरण - सुलेह कुल - सर्वांशी सहमती धर्मसहीष्णूता धोरणाचा पाया.

* निरनिराळ्या धर्मातील चांगली तत्वे घेऊन दिन इ इलाही या पंथाची स्थापना.

* अकबराचे हिंदू धोरण - हिंदू यात्रिकांवरील कर रद्द, गोहत्या बंदी, जिझिया कर रद्द, कर्तबगार हिंदूंना व राजपुतांना अधिकारपदे, राजपूत राण्यांना स्वतंत्र.

* जहागीर - जहागिरविरुद्ध आक्रमण करणारा व बंड करणारा - खुर्रम शहेनशहा.

* औरंगजेबचे सत्तासंघर्षांत पराभूत केलेले त्याचे बंधू - दारा, शुजा, मुराद.

* औरंगजेबाने जिंकलेले प्रदेश - आसाम, विजापूर, गोवळकोंडा.

* औरंगजेबाने ज्यांची हत्या केली ते शिखांचे नववे गुरु - गुरु तेगबहादूर.

* औरंगजेब विरुद्ध आवाज उठवणारे - जाट, राजपूत, शीख, सतनामी, पंथीय, बुंदेले, मराठे.

* दख्खनमध्ये मृत्यू पावलेला मोगल सम्राट - औरंगजेब.

* क्रमाने मोघल बादशहा - बाबर [१५२६-१५३०], हुमायून [१५३०-१५४०], अकबर [१५५६-१६०५], जहाँगीर [१६०५-१६२७], शहाजहान [१६२८-१६५८], औरंगजेब [१६५८-१७०७], शेवटचा मोघल सम्राट - दुसरा बहादुरशहा - [ १८३७-१८५८].
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.