गुरुवार, ७ जुलै, २०१६

पेशव्यांकडे राजसत्ता

पेशव्यांकडे राजसत्ता 

पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ 

* महाराणी ताराबाई बरोबरील सत्तासंघर्षात छत्रपती शाहूंना बाळाजी विश्वनाथ मोलाची राजनैतिक व सैनिकी मदत केली होती.

* दिल्ली येथील मोघल दरबारात राजकारणात धडाडीचे हस्तक्षेप करून बाळाजी विश्वनाथने मोगलकडून स्वराज्याचा मुलुख मिळवला.

* दक्खनच्या सहा सुभ्यात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले.

* मोगलांच्या ताब्यातून छत्रपती संभाजींनी पत्नी व छत्रपती शाहूंची माता महाराणी येसूबाईची सुटका करवून त्यांना आणले.

दुसरा पेशवा : पहिला बाजीराव 

* बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र पहिला बाजीराव पेशवेपदी आला.

* दख्खनमधील माऱ्याठ्यांचा प्रतिस्पर्धी निजामाचा पालखेड १७२७ व भोपाळ येथील लढाईत पराभव केला.

* मोगल सरदार महमंदखान बंगश याचा पराभव करून बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याचे रक्षण केले.

* बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमाजी आप्पा याने धर्मांध व जुलुमी पोर्तुगीज राजवटीच्या जोखडातून वसईची मुक्तता केली.

* इराणचा शहा नादिरशहा याच्या हिंदुस्तानावरील आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेच्या वाटेवर असताना नर्मदाकाठी रावेर खेडी मध्य प्रदेश येथे पहिल्या बाजीरावाचा मृत्यू झाला.

तिसरा पेशवा : नानासाहेब 

* पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बाळाजी बाजीराव पेशवा म्हणून नेमला गेला.

* उदगीरच्या लढाईत मराठयांचा दख्खनमधील जुना प्रतिस्पर्धी असलेल्या निजामाचा पराभव करण्यात आला.  मराठ्यांचे नेतृत्व पेशव्यांच्या चुलतबंधू सदाशिवराव भाऊंकडे होते.

* १७५८ मध्ये पेशव्याचा बंधू रघुनाथरावने लाहोर अटकपर्यंत धडक मारून पंजाब मराठ्यांचा प्रभावशाली आणला.

चौथा पेशवा : थोरला माधवराव 

* बाळाजी बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र थोरला माधवराव पेशवेपदी नेमला गेला.

* राक्षसभुवनाच्या लढाईत १७६२ निजामाला पराभूत केले.

* म्हैसूर सुलतान हैदरअलीला पराभूत केले.

* १७७१ साली महादजी शिंदे यांनी दिल्ली जिंकून मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थपित केले. व थोरला माधवराव थेऊर येथे १७७२ मध्ये मरण पावला.

पाचवा पेशवा : नारायणराव  

* थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा कनिष्ठ बंधू नारायणराव पेशवेपदी नेमला गेला. परंतु पेशव्यांच्या घरातील अंतःकरणकलहच्या पार्श्वभूमीवर नारायणराव पेशव्याचा त्याच्या गारद्यांनी खून केला.

* या खुनाच्या कटामध्ये त्याचा चुलता रघुनाथराव व रघुनाथराव यांची पत्नी आनंदीबाई हे सामील होते.

सहावा पेशवा : सवाई रघुनाथराव 

* पेशवा नारायणरावाच्या खुनानंतर त्याचा चुलता रघुनाथराव पहिल्या बाजीरावचा पुत्र अल्पकाळ पेशवा झाला.

* रघुनाथराव पेशवा झाला. परंतु त्याला महाराष्ट्रात खूप विरोध झाला. त्याला सत्तेतून काढून टाकण्यासाठी नाना फडणवीस, महादजी शिंदे, हरिपंत फडके, त्र्यम्बकणांना पेठे, तुकोजी होळकर, भगवंत बोकील, मालोजी घोरपडे.

सातवा पेशवा : सवाई माधवराव 

* पेशवा नारायणरावाच्या खुनानंतर त्याची पत्नी गंगाबाई ही प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. हा लहान अर्भक असतानाच पेशवा झाला. हा पेशवा म्हणजे सवाई माधवराव होय.

* याच्या कारकिर्दीत राज्यकारभार, धोरणे ठरवणे, लढाया, याबाबतचे पुढारपण मुखत्या महादजी शिंदे व नाना फडणवीस यांच्याकडे होते, दोघांनी मराठा साम्राज्याचे रक्षण केले.

* खर्ड्याची लढाई - या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पेशवा सवाई माधवराव याचा १७९५ मध्ये अपघाती मृत्यू झाला.

* सवाई माधवरावाच्या मृत्यू नंतर रघुनाथरावांचा पुत्र दुसरा बाजीराव हा पेशवा झाला. याच्या कारकिर्दीत मराठा सत्तेचा इंग्रजांकडून शेवट झाला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.