रविवार, १० जुलै, २०१६

चालू घडामोडी ५ ते १० जुलै - २०१६

चालू घडामोडी ५ ते १० जुलै - २०१६ 

* अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु या ग्रहासाठी व त्याच्या अभ्यासासाठी ज्यूनो या अंतरयान गुरु ग्रहेच्या कक्षेत सोडले.

* भारतात नोकरीसाठी गुगल इंडिया या संस्थेला पहिला मान मिळाला आहे.

* बॉम्बे व मद्रास उच्च न्यायालयाचे नाव बदलून आता मुंबई उच्च न्यायालय व चेन्नई उच्च न्यायालय असे ठेवण्यात आले आहे.

* महाराष्ट्र राज्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडविणारा नागपूर - औरंगाबाद - मुंबई हा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे यासाठी शेतकऱ्यांची जमीन नवीन लँड पुलिंग या कायद्याने घेण्यात येणार आहे. त्यात शेतकऱ्यांना भागीदारी पद्धतीने त्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे.

* शाळेचा परिसर, रस्ते, प्रांगण यांना स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही मोहीम हाती घेतली आहे.

* जिएसटी या कर कायद्यासाठी १२२ वि दुरुस्ती करून हा कायदा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे, आणि लोकसभेत हा कायदा पास झाला असून आता राज्यसभेत हा कायदा करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

* स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान भारतीय सैन्यदलात सामील करण्यात आले आहे.

* औरंगाबाद येथे येणाऱ्या ऑकटोबर मध्ये देशातील पहिली पर्यटन परिषद औरंगाबाद मध्ये भरविण्यात येत आहे. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी, पर्यटनाबाबत धोरणे आखण्याचे विचार या परिषदेमध्ये घेण्यात येतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.