शुक्रवार, १ जुलै, २०१६

भारत : संरक्षण दले

भारत : संरक्षण दले 

संरक्षण दलातील अधिकारपदे 

* भारतीय सैन्य दलाचा सुप्रीम कमांडर-इन-चीफ - राष्ट्रपती असतो.

* भूदलातील अधिकारपदे अनुक्रमे - जनरल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट अशी भूदलातील अधिकार पदे आहेत.

* नौदलातील अधिकारपदे अनुक्रमे - ऍडमिरल, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, व्हाईस ऍडमिरल, रिअर ऍडमिरल, कमोडोर, कॅप्टन, कमांडर, लेफ्टनंट कमांडर, लेफ्टनंन्ट, सब लेफ्टनंट, अकटिंग सब लेफ्टनंट. अशी अधिकार पदे आहेत.

* वायुदलातील अधिकारपदे अनुक्रमे - एअर चीफ मार्शल, चीफ ऑफ एअर स्टाफ, एअर मार्शल, एअर व्हाईस मार्शल, एअर कमोडोर, ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर, स्काड्रन लीडर, फ्लाईट लेफ्टनंट, फ्लाईंग ऑफिसर, पायलट ऑफिसर.

* सेना दलाचे एकूण सहा विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे, पश्चिम विभाग, पूर्व विभाग, उत्तर विभाग, मध्य विभाग, आणि प्रशिक्षण विभाग हे आहेत.

संरक्षण दलाची लढाऊ सामग्री 

* भूदल - तोफ - बोफोर्स, रणगाडे - टी ५५, टी,७२, टी ९० रशियन बनावटीचे, विजयंता, अर्जुन, करण, कर्ण हे भारतीय बनावटीचे. क्षेपणास्त्रे - पृथ्वी, त्रिशूल, अग्नी, आकाश, नाग, अस्त्र, ब्राम्होस, सागरीका,

* नौदल - क्षेपणास्त्र - आयएनएस विभूती, आयएनएस विपुल, आयएनएस नाशक, आयएनएस प्रहार, आयएनएस प्रभात, विमानवाहू नौका - आयएनएस विराट,आयएनएस विक्रांत - भारताची पहिली विमानवाहू नौका,

* वायुदल - लढाऊ विमाने - सुखोई, हंटर, मिग २१, तेजस, LCA,

* सेना दलाच्या तुकड्या - मराठा लाईट इन्फ्रंट्री, राजपूत रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, महार रेजिमेंट, सिख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, कुमाऊ रेजिमेंट, नागा रेजिमेंट.

सेनादलाची काही प्रशिक्षण केंद्रे 

* महाराष्ट्र - नॅशनल डिफेन्स ऑफ अकेडमी, खडकवासला पुणे, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कुल अहमदनगर, स्कुल ऑफ आर्टिलरी देवळाली नाशिक, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग खडकी, मिलिटरी ट्रेनींग स्कुल अँड डेपो पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ कामठी.

* उत्तराखंड - इंडिअन मिलिटरी अकेडमी डेराडून, राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज डेहराडून, आर्मी काडेड कॉलेज डेहराडून

* मध्यप्रदेश - कॉलेज ऑफ कोम्बोत महू, कॉलेज ऑफ मटेरियल मॅनेजमेंट जबलपूर,

* दिल्ली - नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली.

* तामिळनाडू - डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन.

* कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट सिंकदरबाद हैद्राबाद.

* नौदलाची प्रशिक्षण केंद्रे - महाराष्ट्र - आयएनएस - शिवाजी लोणावळा, आयएनएस - कुंजली, कॉलेज ऑफ नेव्हल वोरफेअर मुंबई, आयएनएस गरुड कोची, नेव्हल अकेडमी, आयएनएस सातवाहन - विशाखापट्टणम,

* वायुदलाची प्रशिक्षण केंद्रे - एअर फोर्स ऍकेडेमी हैद्राबाद,

* प्रादेशिक सेना स्थापना - १९४९ साली झाली.

* राष्ट्रीय छात्र सेना NCC - स्थपणा १९४८ साली झाली आहे.

* भारतीय तटरक्षक दल यांची स्थापना १९७८ या साली झाली.

भारतीय सैन्यदलाच्या काही रणगर्जना 

* मराठा लाईट इन्फ्रंट्री - श्री शिवाजी महाराज की जय

* राजपूत रेजिमेंट - बजरंग बली की जय

* राजपुताना रायफल्स - राजा रामचंद्र की जय

* डोग्रा रेंजमेंट - दुर्गा माता की जय

* बिहार रेजिमेंट - बिरसा मुंडा की जय

* सिख रेजिमेंट - वाह गुरुजी की खालसा, वाह गुरुजी की फते

* मद्रास रेजिमेंट - वीर मद्रासी आदी कोल्लू

* गढवाल रेजिमेंट - बद्री विशाल कि जय

* कुमाऊ रेजिमेंट - कल्का माई की जय

* जाट रेजिमेंट - जाट बलवान जय भगवान 




























0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.