रविवार, १९ जून, २०१६

पूर - Floods

पूर - Floods 

* पावसाच्या जास्त पाण्याचे किंवा बर्फ वितळल्याने नदीपात्र तुडुंब भरून वाहते काही वेळा ते पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरते, त्याला पूर म्हणण्याचा प्रघात आहे.

* पूर आपत्तीमध्ये अनेक नद्यामुळे सतत नुकसान होत आलेले आहे. चीनमधील हुवांग हो नदी अश्रूंची नदी म्हणून ओळखली जाते.

पूर नियंत्रण 

* नदी नाल्याचे पुराचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरू न देता नदीतून वाहून म्हणजे पूर संबोधले जाते.

* आपत्ती नियंत्रणासाठी पूर नियंत्रण करणे, नदीकीनाऱ्याची धूप थांबवून आजूबाजूचा प्रदेश सुपीक असते.

* नदीपात्रातील किंवा किनाऱ्यावरील बांधकाम, इमारती व तटबंधी यांना धोका पोहोचू नये.

* मार्गदर्शक बांध - बांधावरील माती वाहून जाऊ नये म्हणून पृष्ठभागावर सपाट दगडाचे आवरण उपयोगात आणले जातात.

* तिरबंध व तटबंधी - नदीचा जेवढा भाग सुरक्षित ठेवायचा असेल तर तेवढ्या भागात तिरबंध बांधतात तिर भागातील अंतर त्यांच्या लांबीच्या २ ते २.५ पट ठेवतात.

* नदीकाठ संरक्षण - नदीच्या काठाच्या संरक्षणासाठी दगडांचे दोन्ही नदीच्या काठांचे संरक्षण केले जाते.

पूर पाणी व्यवस्थापण 

* पुररोधक तलाव - नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी नदीमार्गात पूररोधक तलावाची आवशक्यता आहे.

* धरणे बांधणे - नदीवरील पुराचे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी नदीवर धरणे बांधावीत जेणेकरून पाणी अडवल्या जाईल.

* झायडार झी प्रकल्प - नेदर land उत्तर किनाऱ्यावर झायडर झी नावाचे एक मोठे अखात आहे. जेव्हा समुद्रामध्ये वादळ निर्माण होत असे तेव्हा या आखातात प्रचंड लाटा निर्माण होऊन किनारपट्टीचे खूप नुकसान होत असे.

* आजूबाजूची जमीन सुद्धा शेतीसाठी निरुपयोगी ठरत असे, याला पर्याय म्हणून उत्तर समुद्रात ६० किमी लांबीचा व २० मीटर उंचीचा मातीचा बंधारा बांधला गेला आहे.

* डेल्टा प्रकल्प - नेदर land नैऋत्य किनाऱ्यावर ऱ्हाईन नदीची सहा मुखे आहेत. उत्तर समुद्रातील वादळाने निर्माण होणाऱ्या आपत्तीचा तडाखा या मुखाभोवतीच्या प्रदेशाला बसतो.

* यावर उपाय म्हणून ऱ्हाईन नदीची ६ पैकी ५ मुखे नदीत मातीचे बांध घालून बंद करण्यात आलेली आहे. यालाच डेल्टा प्रकल्प असे म्हणतात.

 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.