शनिवार, २५ जून, २०१६

चालू घडामोडी पुरस्कार - २०१५-१६

चालू घडामोडी पुरस्कार - २०१५-१६

* सन २०१६ चा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार प्रा. रामचंद्र मुटाटकर यांना देण्यात आला.

* २०१५ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषेसाठी देण्यात आला हा पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना यांच्या [हिंदू समृद्ध जगण्याची अडगळ या कादंबरीसाठी देण्यात आला.

* जर्मनीचा २०१६ या सालचा द क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरीट हा पुरस्कार भारतीय वंशाच्या रसायनशास्त्रज्ञ यांना प्रदान करण्यात आला.

* महाराष्ट्र शासनाचा २०१५ सालचा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक व लेखक प्रा. रा. ग. जाधव यांना प्रदान करण्यात आला.

* दक्षिण आशियाई साहित्य पुरस्कार सन २०१६ साठी लेखिका अनुराधा रॉय यांच्या स्लिपींग ऑन द ज्युपिटर या कादंबरीसाठी देण्यात आला.

* २०१६ साथीचा ऑस्ट्रेलियातील सर्वोच सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ चेन्नूपाटी जगदीश यांना मिळाला आहे.

* सन २०१५ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार अभिनेता मनोज कुमार यांना देण्यात आला.

* २०१५ सालचा ५१ वा ज्ञानपीठ पूरसाकर रघुवीर चौधरी गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी यांना देण्यात आला.

* रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१५ चा संजीव चतुर्वेदी व अंश गुप्ता भारत यांना मिळाला.

* २०१४ चा नोबेल पुरस्कार कैलाश सत्यार्थी व मलाला युसुफ झाई यांना प्रदान करण्यात आला. तसेच २०१५ नॅशनल डायलॉग क्वार्टेड संस्था ट्युनिशिया या संस्थेला देण्यात आला.

* २०१५ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर यांना घोषित करण्यात आला.

* इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार २०१४ इस्रो संघटना यांना प्रदान करण्यात आला, तर २०१५ सालचा युएनएचसीआर - संयुक्त उच्चयुक्तालय यांना प्रदान करण्यात आला.

* भारतरत्न पुरस्कार २०१४ चा प्रो. सी. एन. आर. व सचिन तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला. तर २०१५ सालचा पुरस्कार मदन मोहन मालवीय व अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आला.

* महाराष्ट्र शासनाचा गणसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०१५ प्रभाकर जोग यांना प्रदान करण्यात आला.

  
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.