सोमवार, १३ जून, २०१६

शाश्वत शेती

४.९ शाश्वत शेती 

शाश्वत शेती स्वरूप 

* कृष म्हणजे नांगरणे, या धातूपासून कृषी हा शब्द बनला आहे. जमीन नांगरून तिच्यात बी पेरणे, त्याच्या रोपाची काळजी घेणे व त्यापासून उत्पादन मिळविणे म्हणजे कृषी होय. 

* जगातील कृषीची कल्पना प्रथमता स्त्री वर्गाने प्रतिपादन केली आहे. शाश्वत शेती प्रामुख्याने पर्यावरण व त्याच्या घटकांचा समतोल कायम ठेवून अधिक उत्तम कृषी उत्पादन व पर्यावरण संरक्षण यांचा समावेश होतो. 

* पर्यावरणाचा समतोल राखणे, चिरकाल शेती उत्पादनात वाढ करणे, नैसर्गिक साधनसंपत्ती व परिस्थितीचे जतन करणे. 

* नैसर्गिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करणे, मृदा प्रदूषण टाळणे, नैसर्गिक पर्यावरण व सांस्कृतिक पर्यावरणावर शेतीपद्धती पिकपद्धती यांच्यात बदल करणे. 

* शाश्वत शेतीपद्धतीत  जल, मृदा, प्राणी, वन, पर्यावरण यांचे संवर्धन करणे. अमर्याद मृदा वापर, रासायनिक खते कीटकनाशके, यांचा वापर टाळावा, त्याऐवजी नैसर्गिक खते, कीटकनाशके यांचा वापर करावा. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.