बुधवार, २२ जून, २०१६

इस्रोची विक्रमी कामगिरी २०१६

इस्रोची विक्रमी कामगिरी २०१६

* भारतीय अंतराळ संशोधन संस्था [इस्रो] या संस्थेने सतीश धवन अंतराळ तळावरून एकाच अग्निबाणाने तब्बल २० उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

* या उपग्रहामध्ये इस्रोचा कार्टोस्टॅट २, तर चेन्नई येथील सत्यभामा विद्यापीठाचा सत्यभामा सॅट, तर पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेज चा स्वयम, हे उपग्रह भारतीय तर १७ उपग्रह विदेशी होते.

* यातील सर्वात महत्वाचा कार्टोस्टॅट हा ७२५ किलो वजनाचा होता, याचा उपयोग रिमोट सेन्सिंग सेवा प्रदान करेल, तर सत्यभामा व स्वयंम या उपग्रहाचा उपयोग अनुक्रमे शैक्षणिक व हॅम रेडिओ याच्यासाठी केला जाईल.

* इस्रोने याआधी पीएसएलव्ही यांच्या मदतीने २००८ रोजी १० उपग्रह सोडले होते, तर अमेरिकेच्या मिनोटॉर १ या अग्निबाणाने २९ उपग्रह सोडले होते, तर रशियाच्या DNEPR या अग्निबाणाने एकाच वेळी ३३ उपग्रह सोडले होते.

* कार्टोस्टॅट २ चा वापर कार्टोग्राफी, शहरी व ग्रामीण अप्लिकेशन तटवर्ती भूमी उपयोग व नियमन तसेच रस्ते नेटवर्क निगराणी, जल वितरणाच्या सुविधांच्या व्यवस्थापना करीता केला जाईल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.