शुक्रवार, १७ जून, २०१६

भारतीय क्षेपणास्त्रे

भारतीय क्षेपणास्त्रे 

अग्नी क्षेपणास्त्र 

* प्रथमता २२ मे १९८९ रोजी ७ वाजून १७ मिनिटानी ओरिसातील चांदीपूर तळावरून अग्नीची पहिली चाचणी झाली.

* आतापर्यंत विकसित कार्यक्रमात अनेक चाचण्या होऊन अग्नी क्षेपणास्त्र हे दीर्घपल्ल्याचे गाईडेड प्रक्षेपणास्त्र असल्याचे यशस्वी सिद्ध झालेले आहे.

* जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर सरळ हल्ला करीत नाही. क्षेपणास्त्राचे उड्डाण होताच क्षेपणास्त्र आकाशाच्या दिशेने झेप घेते.

* सुमारे ३५० किमी अंतर कापून ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाते. नंतर गोलाकार फिरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने झेप घेते.

* पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून आपल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करते. १५०० ते २५०० कि मी पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राचे सध्या ३००० किमी असा पल्ला गाठला आहे.

पृथ्वी क्षेपणास्त्र 

* सुरवातीस २५ फेब्रुवारी १९८८ रोजी पृथ्वी क्षेपणास्त्राची सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र रशियाच्या SS १५० या श्रेणीचे असून त्याचा मारा १५० ते २५० किमी चा आहे.

* या टक्टीकल बटलफिल्ड मिसाईल याचा पल्ला ४० ते २५० कि मी असून जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यात येणाऱ्या या प्रणालीचा या प्रणालीचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे.

इतर क्षेपणास्त्रे 

* त्रिशूल - जमिनीवरून आकाशात त्वरित झेपावणाऱ्या या क्षेपणास्त्राची रचना रशियाच्या SAM - SA-८ प्रणालीवर आहे. त्या क्षेपणास्त्रचा पल्ला ५०० मीटर ते ९ किमी आहे.

* आकाश - जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या sam प्रकारातील आकाश क्षेपणास्त्र रचना हवाई संरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. द्विस्तरीय भारवाहक क्षमतेच्या या क्षेपणास्त्राचा पल्ला २५ किमी आहे.

* नाग - रणगाडाविरोधी हे क्षेपणास्त्र गोळ्या झाडा व विसरून जा आणि वून आक्रमण तत्वावर तयार झालेले आहे. शत्रूचे रणगाडे फोडणारे नाग क्षेपणास्त्र शत्रूचे मनोध्यर्य नष्ट करणारे व शत्रूला गर्भगळीत करणारे क्षेपणास्त्र आहे.

* ब्राम्होस - ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने धावणारे हे क्षेपणास्त्र १४ किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. त्याची मारक क्षमता २५० कि मी पर्यत आहे.

* सूर्य क्षेपणास्त्र - भारतीय संरक्षण संशोधन विकास संघटनेच्या शास्त्रज्ञकडून सूर्य क्षेपणास्त्राचा विकास करण्यात आला आहे. सूर्य क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५००० कि मी एवढी असेल. या क्षेपनास्त्रावरून ३००० कि मी पर्यत अणुविषयक शास्त्र वाहून नेण्याची क्षमता राहणर आहे.

* अस्त्र क्षेपणास्त्र - DRDO या विभागाने या अस्त्राची निर्मिती केली असून हे अस्त्र क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

* दानुष क्षेपणास्त्र - त्रिशूल क्षेपणास्त्र मालिकेतील हे क्षेपणास्त्र लढाऊ जहाजावरून सोडण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे आहे. पुष्ठभागावरून १५० ते ३०० समुद्री मैलावरून मारा करू शकते.

* धनुष क्षेपणास्त्र - कमी पल्ल्याच्या पृथ्वीक्षेपनास्त्र मालिकेतील या धनुष क्षेपणास्त्र याचा विकास करण्यात आला होता. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २५० कि मी आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.