गुरुवार, २ जून, २०१६

सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत सहभाग व संघटना

सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत सहभाग व संघटना 

राष्ट्रीय जलविद्युत कॉर्पोरेशन लिमिटेड [ NHPC ]

* १५,००० कोटी रुपये भांडवलाचा प्रकल्प भारत सरकारच्या [ अ ] श्रेणी व लघुउद्योगामध्ये आहे. पूर्वी तो राष्ट्रीय जलविद्युत निगम लिमिटेड  नावाने ओळखला जात असे.

* मे १९७५ स्थापन करण्यात आलेल्या हा प्रकल्प आता विशालकाय बनले आहे.

* निरनिराळ्या जलविद्युत योजना प्रकल्प तयार करणे, भारतामध्ये आणि परदेशामध्ये पारंपारिक आणि अपारंपरिक माध्यमातून वीजनिर्मिती करणे यासारखे कार्य NHPC मधून केले जाते.

राष्ट्रीय औष्णिक विद्युत कॉर्पोरेशन [ NTPC ] 

* सन १९७५ मध्ये अस्तित्वात आलेल्या या कंपनीचे दोन वेळा नामकरण झालेले आहे.

* मार्च २००९ अखेर वीज उत्पादन १८.८२% होते. सध्या उत्पादन क्षमता ३०,६४४ mv एवढी आहे.

* हि कंपनी भारत सरकारच्या एका नवरत्न कंपनीपैकी आहे. कोळसा ब Gas या दोन्हीवर आधारित कंपनी आहे.

भारतातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प 

* भारतामध्ये १९ शतकाच्या शेवटी दार्जीलिंग येथे १३० KV क्षमतेचे पहिले जलविद्युत केंद्र सुरु झाले.

* भाक्रा नांगल योजना - सतलज नदीवर हि जलविद्युत केंद्र निर्माण करण्यात आले.

* दामोदर योजना - हि योजना अमेरिकेतील टेनेसी खोरे योजनेवर आधारित आहे. त्या योजनेतून ४ जलाशय एकत्र आहेत.

* हिराकूड प्रकल्प - महानदीवरील संबलपूर जिल्ह्यात हि योजना पूर्ण करण्यात आली असून त्यावर जल विद्युत प्रकल्प आहे.

* कोयना प्रकल्प - कोयना नदीवर ही योजना पूर्ण करण्य्यात आली. या योजनेद्वारे मुंबई - पुणे परिसरात वीजपुरवठा करण्यात येतो.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.