शुक्रवार, २४ जून, २०१६

खेळविषयक घडामोडी २०१६

खेळविषयक घडामोडी २०१५-१६

* महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१५ ही नागपूरमध्ये भरली होती यामध्ये जळगावचा विजय चौधरी याला महाराष्ट्र केसरी तर उपविजेता हा मुंबईचा विक्रांत जाधव हा झाला.

* मेलबर्न या ठिकाणी २०१६ ची ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच या पुरुष एकेरी स्पर्धेत विजयी झाला तर उपविजेता इंग्लंडचा अँडी मरे. तसेच महिला एकेरीत जर्मनीची अँजेलिक्यू कर्बर तर उपविजेती अमेरिकेची सेरेना विल्यम्स ठरली.

* २०१६ साठी भारताची नेमबाज खेळाडू अयोनिका पॉल ही ब्राझील रियो ऑलम्पिकसाठी पात्र ठरली आहे.

* लिओनल मेस्सीला २०१५ चा बलॉन डी ऑर सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केला आहे.

* २०१६ च्या १९ वर्षाखालील ज्युनियर क्रिकेट विश्वकप स्पर्धा बांग्लादेश येथे आयोजित केली होती, यात विजेता संघ वेस्ट इंडिज ठरला तर उपविजेता संघ भारत ठरला.

* २०१९ मध्ये १३ वि आशियाई क्रीडा स्पर्धा नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित केली जाईल.

* २०१६ च्या IPL क्रिकेट खेळाडूत सर्वात महाग खेळाडू पवन नेगी तर युवराज सिंग दुसऱ्या स्थानावर राहिला.

* २०१६ ची रणजी ट्रॉफी मुंबई रणजी क्रिकेट संघाने जिंकली तर उपविजेता संघ हा सौराष्ट्र रणजी संघ ठरला.

* २०१६ ची संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा नागपूर येथे आयोजित केली होती.

* १३ वि आशियाई कप टी-२० स्पर्धा २०१६ रोजी आयोजित केली होती त्यात भारत संघ हा विजेता झाला तर बांग्लादेश हा उपविजेता संघ झाला.

* भारताची नाशिकची कविता राऊत हिला दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून रिओ ऑलम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे, तिला भारताची सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाते.

* बीसीसीआय तर्फे दिल्या जाणाऱ्या सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार २०१५ साठी सय्यद किरमाणी यांना घोषित करण्यात आला आहे, तसेच २०१४ साठी दिलीप वेंगसकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

* २०१५  साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सानिया मिर्झा हिला देण्यात आला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.