गुरुवार, ९ जून, २०१६

जलविद्युतनिर्मिती

जलविद्युतनिर्मिती 

* जगातील सर्वच देशामध्ये जलविद्युत याचा प्रयत्न चालू आहे. जलविद्युत च्या निर्मितीच्यासाठी जलसंधारण, नद्या, विहिरी, तळे, समुद्र, किंवा यांचाही विचार करणे गरजेचे आहे.

* जलव्यवस्थापन - पाण्याचा योग्य रीतीने वापर करणे, पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत झिरपेल अशी व्यवस्थापन करणे, वापरलेल्या पाण्याचा पुन्हा उपयोग करणे याला जलव्यवस्थापन असे म्हणतात.

* पाण्याचा काटकसरीने उपयोग करणे, पावसाचे पाणी वाहून न जाऊ देता ते जमिनीत झीरपविणे, टाकीत किंवा खड्यात साठविणे यालाच जलसंवर्धन असे म्हणतात.

* २२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जलसंधारण 

* आपल्या एकूण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७१% भाग पाण्याने व्यापला असला तरीही मानवी जीवनास उपयुक्त साठ्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.

* एकूण उपलब्द पाण्याच्या २.८% पाणी  गोड्या स्वरुपात आहे. तर ९७.२% पाणी हे समुद्रीय भागात म्हणजे खारट स्वरुपात आहे.

* पाण्याची उपलब्धता सागरीय स्वरुपात - ९७.२५%, झर्याच्या स्वरुपात - ०.०१%, बर्फाच्या स्वरुपात - २.०५%, माती ओलाव्याच्या स्वरुपात ००.००५%, भूगर्भजल - ००.६८%, नद्यांच्या आणि अन्य स्वरुपात - ००.००११४%,

जलविवाद 

* भारतामध्ये पाण्याच्या संदर्भात जे विवाद किंवा संघर्ष निर्माण होतात. त्यातील काही प्रमुख जलविवाद पुढीलप्रमाणे आहेत.

१] सतलज - यमुना - पंजाब आणि हरयाणा राज्य
२] कृष्णा - कर्नाटक व आंध्रपरदेश
३] यमुना - हरियाना व दिल्ली
४] नर्मदा - मध्यप्रदेश, महाराष्ट्र, व गुजरात
५] कावेरी - कर्नाटक व तामिळनाडू


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.