शनिवार, २५ जून, २०१६

संमेलने व परिषदा २०१५-१६

संमेलने व परिषदा २०१५-१६

* अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन २०१५ [९५वे] बेळगाव येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्ष फय्याज शेख हे होते.

* अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन २०१६ [९६वे] ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे आहेत.

* जी २० देशांच्या केंद्रीय बँक प्रमुखांची जागतिक परिषद २०१६ ही चीनमधील शांघाय येथे आयोजित करण्यात आली. यासाठी RBI भारताचे गव्हर्नर रघुराम राजन हजर होते.

* चौथी जागतिक आण्विक सुरक्षा परिषद २०१६ वाशिंग्टन अमेरिका येथे आयोजित करण्यात आली होती.

* २०१५ ची COP म्हणजे जागतिक हवामान विषयक परिषद २१ वी फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती.

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ८८ वे २०१५ घुमान पंजाब येथे आयोजित करण्यात आले होते त्याचे अध्यक्ष सदानंद मोरे होते.

* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ८९ वे २०१६ पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले होते त्याचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे होते.

* विश्व मराठी साहित्य संमेलन २०१५ हे पोर्ट ब्लेअर येथे आयोजित करण्यात आले होते त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे हे होते.

* सार्क शिखर परिषद २०१४ मध्ये नेपाळ काठमांडू येथे आयोजित करण्यात आली होती, तसेच २०१६ मधील पाकिस्तान मधील इस्लामाबाद येथे आयोजीत करण्यात आली होती.

* २०१५ मधील प्रवासी भारतीय संमेलन गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आले होते, २०१६ मधील १४ वे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.