गुरुवार, ३० जून, २०१६

भारत : भूगोल सामान्य माहिती

भारत : भूगोल सामान्य माहिती 

भारत : स्थान, सरहद्द, विस्तार 

* ८.४ उत्तर ते ३७.० उत्तर अक्षांश व ६८.७ पूर्व ते ९७.२५ पूर्व रेखांश यांच्या दरम्यान आहे, उत्तर गोलार्धात देश, कर्क वृत्त भारताच्या मध्यातून जाते, उत्तरेकडील भूमी समशीतोष्ण तर दक्षिणेकडील भूमी उष्ण कटिबंधात.

* एकूण जमीन सरहद्द १५,२००, एकूण सागरी सरहद्द ७५१७, सरहद्दीवरील पश्चिम व वायव्य सरहद्दीवरील पाकिस्तान व अफगाणिस्तान, उत्तर सरहद्दीवर चीन, नेपाळ, भुटान, पूर्व सरहद्दीवर म्यानमार, बांग्लादेश. दक्षिणेला मन्नारचे आखात व पालकची सामुद्रधुनी, श्रीलंका, आहे.

* बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार द्विपसमूहातील सर्वात दक्षिणेकडील बेटे, इंडोनेशियातील सुमात्रा बेटापासून सुमारे १६० किमी आहेत. भारताच्या सर्वात दक्षिणेकडील स्थान [ इंदिरा पॉईंट ] आहे, तर याचे जुने नाव पिग्मलियन पॉईंट [ निकोबार बेटे ] आहेत.

* भारताची दक्षिणोत्तर लांबी ३२१४ आहे, पूर्व पश्चिम लांबी - २९३३ आहे, क्षेत्रफळ ३२,८७,७८२ आहे. जगाच्या भूमीच्या २.४% आहे.

* भारताचा क्षेत्रफळ विस्ताराने जगात सातवा क्रमांक लागतो - रशिया, चीन, कॅनडा, अमेरिका, ब्राझील, व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

* भरतीय उपखंड - भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भुटान, यांनी मिळून बनलेला दक्षिण आशियातील वैशिट्यपूर्ण भूभाग.

भारत : प्राकृतिक विभाग

* उत्तरेकडील हिमालयीन पर्वतीय प्रदेश - काश्मीरपासून पूर्वेस अरुणाचल प्रदेश पर्यंत जगातील सर्वात नवीन व उंच प्रदेश आहे. लांबी सुमारे २५००, रुंदी १५० किमी, क्षेत्रफळ ५ लाख चौ किमी. उंची ८००० हजाराहून जास्त.

* हिमालयाच्या तीन रांगा - सरासरी ६००० मीटरहून उंच असलेला उत्तर अंगाचा हिमांद्री किंवा बृहत हिमालय, १२० ते २०० किमी. २००० ते ३००० मीटर उंचीचा हिमाचल किंवा छोटा हिमालय रुंदी ६० ते ८० किमी आहे. सरासरी १००० ते १५०० किमी उंचीच्या शिवालिक टेकड्या आहेत.

* भारताची किनारपट्टी - पूर्व किनारपट्टी १,०२,८८२ चौ किमी, तर पश्चिम किनारपट्टी - ६४,२८४ चौ किमी.

* भारतीय पठार - नर्मदेच्या उत्तरेकडील पठारी प्रदेश, व नर्मदेच्या दक्षिणेकडील पठारी प्रदेश.

भारत : घटकराज्ये माहिती 

* भारतात एकूण २९ घटक राज्ये आहेत आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.

* क्षेत्रफळानुसार भारतातील पहिली पाच राज्ये - राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आहेत.

* लोकसंख्येनुसार भारतातील पहिली पाच राज्ये - उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक आहेत.

* घनतेनुसार भारतातील पहिली पाच राज्ये - पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, उत्तरप्रदेश, पंजाब आहेत.

* साक्षरतेनुसार भारतातील पहिली पाच राज्ये - केरळ, मिझोराम, गोवा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आहेत.

भारतातील नाड्याकाठची शहरे 

* गंगा - हरिद्वार, कानपूर, पाटणा, वाराणसी, अलाहाबाद,

* यमुना - दिल्ली, मथुरा, आग्रा

* सतलज - रोपार, नंगल, फिरोजपूर, लुधियाना

* ब्रह्मपुत्रा - दिब्रुगड, गुवाहाटी,

* नर्मदा - जबलपूर, भरूच

* तापी - भुसावळ, सुरत

* गोदावरी - नाशिक, पैठण, नांदेड, राजमुंद्री

* कृष्णा - सांगली, विजयवाडा

* मुसी - हैद्राबाद

* कावेरी - श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली, तंजावूर

* महानदी - संबळपूर, कटक

* हुगळी - कोलकाता

* सुवर्णरेखा - जमशेदपूर

भारतातील पर्वत व शिखरे 

* हिमालय - के-२, गाशेरब्रुम, नंगा पर्वत, नंदादेवी, कामेट, कांचनगंगा.

* अरवली - गुरुशिखर - थंड ठिकाण - माउंट अबू

* सातपुडा - धूपगढ - थंड ठिकाण - पंचमढी, तोरणमाळ

* पश्चिम घाट - कळसुबाई - थंड ठिकाण - महाबळेश्व, माथेरान

* निलगिरी - दोडाबेट्टा, माकुर्णी, उदकमंडलम

भारत : मृदा

* गाळाची मृदा - गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, या नद्यांच्या खोऱ्यात ही मृदा आढळते. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, प बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ही मृदा आढळते.

* पर्वतीय मृदा - उत्तर व ईशान्य भारतातील डोंगराळ भागातील पर्वत उतारावर खडक झिजून ही मृदा बनते, ती जाडी भरडी असते.

* वालुकामय मृदा - मध्य व पश्चिम राजस्थान या भागात ही मृदा आढळते.

* रेगूर मृदा - मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागात ही मृदा आढळते.

* तांबडी मृदा - तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उडीसा, गोवा, झारखंड, छत्तीसगढ या राज्यात ही मृदा आढळते.

* जांभी मृदा - दक्षिण महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक या राज्यात ही मृदा आढळते.

* दलदलयुक्त मृदा - सुंदरबन, उडीसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू

* क्षारयुक्त अल्कली मृदा - पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तरप्रदेश या भागात ही मृदा आढळते.

भारत समुद्र 

* समुद्र - पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.

* आखाते - कच्छचे आखात, गुजरात. खंभातचे आखात, मन्नारचे आखात

* पालकची सामुद्रधुनी पाल्कचा उपसागर व बंगालचा उपसागर यांना जोडणारी

भारत : पठारे, मैदाने, वाळवंटे, त्रिभुजप्रदेश

* भारतीय पठारे - माळवा, बुंदेलखंड, छोटा नागपूर, उत्तर भारतीय पठार, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगण पठार

* मैदाने - पश्चिम मैदान - पंजाब व हरियाणा, मध्य मैदान उत्तर प्रदेश, पूर्व मैदान - बिहार, पश्चिम बंगाल

* वाळवंटे - थरचे वाळवंट राजस्थान व कच्छचे वाळवंट - गुजरात

* त्रिभुज प्रदेश - गंगा नदी, महानदी, गोदावरी, कृष्णा नदी यांचा त्रिभुज प्रदेश.

* किनाऱ्यालगतची बेटे - गुजरात - खंबात, नोरा, बैदा, कारुंभर, पिरोटन, महाराष्ट्र- खांदेरी व करंजा, कर्नाटक - अंजदीव, मेरी, पिजन, केरळ - विपीन, तामिळनाडू - वनवीतु, आंध्राप्रदेश - श्रीहरीकोटा, पुलिकत पश्चिम बंगाल - सागर, बुलचेली, बांगदूनी, मूर इत्यादी

भारत प्रमुख धरणे 

* नागार्जुन सागर - कृष्णा, नंदिकोंडा आंध्र प्रदेश

* पोचपांड - गोदावरी, आंध्रा प्रदेश

* तुंगभद्रा - तुंगभद्रा - होस्पेटजवळ कर्नाटक

* गंडक - गंडक - उत्तर प्रदेश बिहार

* काकरपार - तापी, गुजरात

* कोसी - कोसी - बिहार

* उकाई - तापी - गुजरात

* इडुक्की - पेरियार - केरळ

* उर्ध्वकृष्णां - कृष्णा - कर्नाटक

* तवा - तवा - होशंगाबाद - मध्यप्रदेश

* गांधीसागर - चंबळ - मध्यप्रदेश

* जायकवाडी - गोदावरी - पैठण

* कोयना - कोयना - महाराष्ट्र

* हिराकूड - महानदी - उडीसा

* भाकडा नागल - सतलज - पंजाब, हरियाणा,

* फराक्का - गंगा - पश्चिम बंगाल

* सरदार सरोवर - नर्मदा - गुजरात

* दामोदर - दामोदर - झारखंड

* मलप्रभा - मलप्रभा - कर्नाटक

* रिहद - रिहद - उत्तर प्रदेश

* घटप्रभा - घटप्रभा - धुपदल कर्नाटक

* रामगंगा - रामगंगा - उत्तरांचल

* सलाल - चिनाब - जम्मू आणि काश्मीर

* श्रीशैलम  -कृष्णा

* कृष्णराजसागर - कावेरी - कर्नाटक

भारत : धबधबे, सरोवरे 

* शरावती - जोग/गिरसप्पा - कर्नाटक

* कावेरी - शिवसमुद्रम - कर्नाटक

* सुवर्णरेखा - हुंडरू - कर्नाटक

* नर्मदा - धुवाधार - मध्यप्रदेश

* चंबळ - चुलीया - मध्य प्रदेश

* इंद्रावती - चित्रकोट - छत्तीसगड

* भारतातील खाऱ्या पाण्याचे सरोवर - चिल्का - उडीसा, पुलिकत - आंध्राप्रदेश, सांभार - राजस्थान, अबुसाई - लडाख, लोणार - महाराष्ट्र, वेंबनाड - केरळ, त्सासोमारी - जम्मू आणि कश्मीर

* भारतातील गोड्या पाण्याची सरोवरे - भीमताल - नैनिताल, गुरुडोंगमारचो - सिक्कीम, वुलर, दाल, आचार - काश्मीर,
गोहना - अलकनंदा याच्या पात्रात, कोल्लेरू - आंध्रप्रदेश

भारत वार्षिक पर्जन्यमान

* अतीकमी पर्जन्य [४० सेमी पेक्षा कमी ] प्रदेश - कच्छचे रन, पश्चिम राजस्थान, नैऋत्य पंजाब, पश्चिम हरयाणा, काश्मीरचा उत्तरेकडील भाग

* कमी पर्जन्य [ ४० ते ६० सेमी पर्जन्य ] प्रदेश - पूर्व राजस्थान, पश्चिम गुजरात, पश्चिम पंजाब, पूर्व हरियाणा, दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश

* मध्यम पर्जन्य [ ६० ते १०० सेमी ] प्रदेश - भारताचा बहुतांश भाग - जम्मू काश्मीर चा नैऋत्य भाग, उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग, मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा प्रदेश, तामिळनाडू चा भाग

* १०० ते १५० पर्जन्य प्रदेश - उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उडीसा.

* जास्त पर्जन्य [ १५० ते २५० सेमी ] प्रदेश - हिमालयाच्या पायथ्याचे प्रदेश, पश्चिम घाटाचा उंचावरील प्रदेश, मध्य प्रदेश पूर्व भाग, पश्चिम बंगालचा भाग व असम

* अतिजास्त पर्जन्य [ २५० सेमी पेक्षा जास्त ] - भारताचा पश्चिम किनारा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम

भारत : वारे

* नैऋत्य मान्सून वारे - हे वारे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. या वाऱ्यामुळे भारतात सर्वत्र पाऊस पडतो.

* ईशान्य मान्सून वारे - हे वारे डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान वाहतात. या वाऱ्यामुळे हिवाळ्यातही पाऊस पडतो.

* लू वारे - उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण व कोरडे वारे याला लू वारे असे म्हणतात.

* नॉर्वेस्टर - उन्हाळ्यात पश्चिम बंगाल व उडीसामध्ये बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे वाहतात. त्यांच्या वायव्येकडून आलेल्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांशी संगम होऊन गडगडी वादळांची निर्मिती होते त्यांना नॉर्वेस्टर म्हणतात.

* जेट स्ट्रीम - वातावरणात जास्त उंचीवर तपस्तब्दिवर अक्षवृत्तीय प्रदेशाकडून पश्चिमेकडून वाहणारे अतिवेगवान वारे होय.

* आँधी - उन्हाळ्यात उत्तर भारतात पश्चिमेकडून धुळीच्या वावटळी येतात. पंजाबमध्ये त्यांना आँधी असे म्हणतात.

भारत : वने

* उष्ण प्रदेशीय सदाहरित वने - २७ से तापमानाच्या व ३०० सेमी पर्जन्यमनाच्या प्रदेशातील वने - बांबू, महोगनी, एबनी, रोझवूड, शिसम, प्रदेश - पश्चिम घाट, आसाम, मेघालय, त्रिपुरा, हिमालयाचा पायथा, अंदमान निकोबार बेटे

* उष्ण प्रदेशीय निमसदाहरित वने - २५ ते २७ से तापमानाच्या व २०० सेमी पर्जन्याच्या प्रदेशातील वने, महत्वाचे वने - अंजन, जांभूळ, खैर प्रदेश - पश्चिम किनारा, आसाम, उडीसा


* उष्ण प्रदेशीय पानझडी वने - २३ ते २७ से तापमानाच्या व २०० सेमी पर्जन्याच्या प्रदेशातील वने. महत्वाचे वृक्ष - साग, रोझवूड, साल, बांबू, या वनांनी भारतात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापले आहे. प्रदेश - महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश.

* उष्ण प्रदेशीय आद्र पानझडी वने - २६ ते २७ तापमान व १०० ते १५० सेमी पाऊस, वृक्ष - बांबू, प्रदेश - पश्चिम घाटाचा पूर्व उतार, मध्यवर्ती द्वीपकल्पीय पठार, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक

भारतातील : पशुधन 

* दूध देणाऱ्या गायीच्या उत्तम जाती - साहिवाल, सिंधी, देवणी, गीर,

* दूध देणाऱ्या म्हशीच्या उत्तम जाती - जाफराबादी, दिल्ली, मुऱ्हा, महिसाना, निलीरावी, सुरती, भडवरी, पंढरपुरी.

* बैलांच्या उत्तम जाती - हिस्सार, हन्सी, डुंगी, कांकरेजी

* दूध उत्पादनात अग्रेसर राज्ये - महाराष्ट्र व गुजरात     
    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.