मंगळवार, १४ जून, २०१६

बियाणे

४.१५ बियाणे 

बियाणे स्वरूप 

* बियाण्याचे संशोधनानुसार दोन प्रकार पडतात सुधारित बियाणे, संकरित बियाणे, हे आहेत.

* धान्योत्पादन आणि धान्यात गुणात्मक सुधारणा करणे, धान्योत्पादन संख्यात्मक सुधारणा करणे, धान्योत्पादन कालावधीतील बदल.

* सामान्यपणे ज्या बियाणांची दर्जेदारता वाढवलेली आहे. ज्यांची उपजाऊ क्षमता वाढवलेली आहे निवडक बियाणे म्हणजे सुधारित बियाणे होय.

* धान्याच्या एखाद्या जातीतील उत्तम गुणधर्म त्याच धान्याच्या दुसऱ्या जातीत विशिष्ट पद्धतीने संक्रमित करण्याची प्रक्रिया संकर मानली जाते. यालाच संकरित बियाणे म्हणतात.

विविध पिके व त्यांच्या जाती 

* बाजरी - प्रतिभा, सबुरी, श्रद्धा, एच. बी. - १, एच. एस., एम. एच., आर. सी. टी. पि., आय. सि. एम. व्हि., डब्ल्यू. सि. सी., एम. एम. इत्यादी

* मका - डेक्कन१०३, १०५, गंगा-११, त्रिशुलता, धवन, पंचगंगा, आफ्रिकन, टॉल, जेके २४९२.

* तांदूळ - पनवेल १ २ ३, बासमती ३७०, पुसा बासमती, भोगावती, प्रभावती, अविष्कार, सुगंधा, सह्यान्द्री १ २,  रत्नागिरी, कर्जत, जया, पालहार, रत्ना, तेरणा, अंबिका.

* तूर - विपुला, आय.सीपीएल, ८७३, बिएसएमआर ८५३, ए के टी ८८११, हळवेवान, निमगरवे, बेडीयन, मारुती, कोकण, टी, विशाखा.

* हरभरा - विराट, विजया, जाकी, साकी ९५, १६, दिग्विजय, विहार, गुलक, चाफा, श्वेता, हिरवा चाफा, इत्यादी.

* मुग - वैभव, पुसा वैशाखी, कोपरगाव, फुले एम २, बी एम ४, जे ७१, एस-८, पिएम-९३७६, टीए पी ए ८५१, एकेएम - ८८०३, टि ए आर एम १ २ १८, जळगाव.

* उडीद - बरखा, सिंदखेडा, टी. ए. यु, १, २, मेळघाट, टि ९, टीपीयु ४, एन ५५, डी ६-७,

* सुर्यफुल - एस एस ५६, भानू, मॉडर्न, इसी ६८४१४, के बी एच एस ४४, एम एस एफ एच ८, १७, एलडीएमआरएस एच १ ३,

* उस - संजीवनी, कृष्णा, संपदा, महालक्ष्मी, नीरा, फुले सावित्री, फुले यशोदा, फुले २६५, कोसी ६७१,७४०, ७५२७,

* गहू - विनिता, कादवा, तपोवन, गोदावरी, पंचवटी, त्र्यंबक, एन आय ५४३९, एन ५६४३, एन आय ५७४९.

 संकरीत बियाणे निर्मिती 

* मुलभूत बियाणे - यात ब्रीडर बियाणांच्या आधारे मुलभूत बियाणे निर्मिती होऊन त्यांना पांढरे लेबल लावले जाते. राष्ट्रीय बियाणे महामंडळ, भारतीय राज्य फार्म महामंडळ, राज्य महामंडल यांच्याद्वारे कार्य चालू आहे.

* प्रमाणित बियाणे - व्यापारी तत्वावर मुलभूत बियाणे वितरीत केले जातात त्यांना निळ्या रंगाचे लेबल असते.

* पैदासकार बियाणे - सोनेरी लेबल असलेल्या या बियाण्यांच्या निर्मितीत कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या यांचा सहभाग होतो.

बियाणे मंडळ 

* राष्ट्रीय संस्था - १९६३ पासून दिल्ली येथे चालू आहे.

* राजस्थानातील सुरतगड येथे सन १९५६ पासून रशियाच्या मदतीने भारतीय राज्य फार्म महामंडळ येथे चालू आहे.

* एकूण १४ राज्यात बियाणे महामंडळे कार्यरत आहे, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडल मर्यादित व महाबीज १९७६ पासून कार्यरत आहे.

* बियाणे उत्पादनात १०० पेक्षा जास्त खासगी संस्था उत्पादन व वितरणाचे कार्य करतात.

बी टी कापूस 

* संकरीत कापसाचा उत्तम प्रकार म्हणजे बी टी कापूस होय. या ठिकाणी बसिलास थूरेणजेनिसीस हा या बियाणात जीवाणू होय.

* मातीत आढळणाऱ्या या जीवाणूच्या शरीरातील एक जनुक कापसाच्या बियात टाकून कापूस उत्पादनात म्हणजे बी टी  कापूस होय.

* हि खास स्वरुपाची कपाशी बोंडअळी यास प्रतिकार करते. चुकून बोंडअळीने कपाशीची पाने खाल्ली तर बी टी जनुक बोंड अळीस अन्ननलिका नष्ट करतो.

* सन २००२-३ या साली भारतात बी टी कपाशीच्या व्यापाराला परवानगी मिळाली. कपाशीच्या लागवडीमध्ये पेरणी नंतर नाग्या भरणे प्रक्रिया होते.

* कापसाच्या पिकाच्या पात्या, फुले, बोंडे यांचे नैसर्गिक गळ करण्यासाठी नफ़्थेलिन असेटिक असिडचा उपयोग केला जातो.

* ट्रान्सेजेनिक या कापसाला व्यापारी दृष्ट्या अत्याधिक महत्व आले आहे.


       
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.