बुधवार, ८ जून, २०१६

जगातील सर्वात लांब बोगदा २०१६

जगातील सर्वात लांब बोगदा २०१६

* जगातील सर्वात लांब बोगद्याचे स्वित्झर्लंड मध्ये उद्घाटन करण्यात आले.

* विशेष म्हणजे ५७ किलोमीटरचा हा बोगदा द्विमार्गी लांबीचा आहे, त्या बोगद्याच काम जवळपास १७ वर्षापासून चालू होते.

* ह्या बोगद्याला गोथार्ड बेस टनेल नाव दिले आहे. हा बोगदा स्विस आल्प्स पर्वतातून खालून जाणार असून हायस्पीड रेल्वेद्वारे उत्तर दक्षिण युरोपला जोडणार आहे.

* गोथार्ड बोगद्याने जपानच्या ५३.९ किमीच्या सेइकन रेल्वे बोगद्यालाही मागे टाकले आहे, ब्रिटन व फ्रान्स जोडणारा ५०.५ किमीचा बोगदा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

* या बोगद्याच्या खोदकामावर १२ अब्ज डॉलर खर्च करण्यात आला, तो तयार करावा कि नाही यावर स्वितझर्लंड मध्ये १९९२ मध्ये सार्वमत घेण्यात आले. यात लोकांनी बोगद्याच्या बाजूने कौल दिला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.