सोमवार, १३ जून, २०१६

जैविक अभियांत्रिकी

जैविक अभियांत्रिकी 

* अमेरिकेत टेक्सास प्रयोगशाळेत जैव अभियांत्रिकीचे प्रथिने मिळवण्याचे यशस्वी प्रयोग केलेले आहेत. एक औषधी घटक हेपटायटिस -B साठी उपचारासाठी याच प्रयत्नातून रोगाची लस तयार झालेली आहे.

* जैवतंत्र ज्ञानामुळे जनुकांची शेती हि संकल्पना व कमी खर्चामध्ये औषधी निर्मिती शक्य झालेली आहे.

* जैवतंत्रज्ञानामुळे वस्त्रोउद्योग यामध्ये रसायनांची निर्मिती करणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची उत्पत्तीसुद्धा शक्य झालेली आहे. प्राणीशास्त्रात संकर प्रक्रियेचे उत्तम पद्धतीच्या प्राण्यांची जनावरांची निर्मिती होणे शक्य झालेले आहे.

कृषीक्षेत्रातील जैवतंत्रज्ञान 

* पृथ्वीवरील अन्न उत्पादक जमीन मर्यादित असून लोकसंख्येची अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जमिनीचे क्षेत्र वाढविणे शक्य नसल्याने धान्य उत्पादनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे, त्यासाठी जैव तंत्रज्ञान हा अत्यंत उपयुक्त व सुलभ मार्ग आहे.

* जैवतंत्र ज्ञानावर अन्नधान्याच्या बी-बियानावर प्रक्रिया करून वाढविता येते. वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवून त्यातील पोषक द्रव्यामध्ये भर घालता येते.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.