रविवार, १९ जून, २०१६

चालू घडामोडी १४ ते १९ जून २०१६

चालू घडामोडी १४ ते १९ जून २०१६

* स्पेन येथे चालू असलेल्या मास्टर स्पर्धेत विश्वनाथन आनंद याला नव्यांदा विजेतेपद मिळाले आहे. त्याने या स्पर्धेत चीनच्या वेई यी कोला याला पराभूत केले आहे.

* अमेरिकेतील एक संस्था गझेट रिव्यू या कंपनीने जगातील सर्वात बुद्धिमान देशासंबंधी सर्वे केला त्यात अनुक्रमे हॉंगकाँग, दक्षिण कोरिया, जपान, तैवान, सिंगापूर, नेदरland, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्विडन हे देश आहेत. जगातील सर्वात अभिनव कल्पना राबवणारा देश म्हणून दक्षिण कोरिया या देशाला म्हटले आहे.

* नासाने संशोधनातून गुरुपेक्षा मोठ्या केप्लर १६४७ बी या ग्रहाचा शोध लावला असून त्यासंबंधी विश्वातील सर्वात मोठा ग्रह म्हणून नासाने याला म्हटले आहे. 

* स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, म्हैसूर, हैद्रबाद, पटियाला, बिकानेर आणि जयपूर या बँकाला स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत विलीनीकरनासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

* इंफाळ येथे झालेल्या साहित्य अकादमीत मराठी भाषेतील युवा पुरस्कारासाठी मनस्विनी लता रवींद्र यांच्या ब्लॉगच्या आरश्यापल्याड या लघुकथेला पुरस्कार देण्यात आला. तसेच बाल साहित्यासाठी दिलीप बोरकर यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

* यावर्षीची टंकलेखनाची परीक्षा हि शेवटची परीक्षा म्हणून होणार आहे त्यासाठी आता संगणक परीक्षा चालू होणार आहे.

* भारताने यंदा चहाची विक्रमी निर्यात केली आहे, तब्बल ३५ वर्षानंतर विक्रमी २३२ टन चहाची निर्यात केली गेली.

* गोवा सरकारने राज्यातील बेरोजगारी कमी करण्यसाठी सरकारी नोकरीसाठी सर्वसाधारण वयोमर्यादा ४० वरून ४५ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे.

* पुण्यातील एक चहा विक्रेता याने चक्क चहाची टपरी चालवून CA ची परीक्षा पास केली आहे त्याचे नाव सोमनाथ गिराम असून त्याच्या या गुणासाठी राज्य सरकारने त्याला शैक्षणिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केले आहे.

* भारताने स्वदेशी बनावटीचे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर ४० या विमानाची निर्मिती केली असून त्याची निर्मिती हिंदुस्तान अरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेने केली आहे. 


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.