बुधवार, २२ जून, २०१६

देशात मुंबई तर जगात हॉंगकॉंग शहर महाग २०१६

देशात मुंबई तर जगात हॉंगकॉंग शहर महाग २०१६

* मर्सर या जागतिक संस्थेच्या निष्कर्ष अहवालात मुंबई हे राहणीमानाच्या दृष्टीने देशातील सर्वात महाग शहर ठरले आहे. 

* जगातील बर्लिन, इस्तांबूल, फ्रँकफर्ट, कॅनबेरा, सिऍटल या शहरापेक्षाही मुंबई महाग शहर ठरले आहे. 

* मर्सर या संस्थेने जगातील ३७५ पुढील निष्कर्षावर सर्वेक्षण करण्यात आले यात शहरातील राहणीमानाची स्थिती, कर्मचाऱ्याचे पगार व भत्ते, अन्न, वाहतूक साधने, गरजा, करमणूक साधने, गृहपोयोगी वस्तू, हे यातील प्रमुख घटक होते. 

* त्या आधारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरांना २०९ क्रम देण्यात आला, त्यात मुंबईला ८२ क्रमांक मिळाला, तर दिल्लीला १३० वा क्रमांक मिळाला. 

* या सर्वेक्षणात चेन्नईला १५८, बंगळुरू १८०, कोलकाता १९४ व्या क्रमांकावर आहेत, वाहतुकीच्या साधनांच्या बाबतीत बंगळुरू शहर देशात सर्वात महाग ठरले आहे. 

* जगात हॉंगकॉंग हे सर्वात महाग शहर ठरले तर लुआंडा, अँगोला, हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर झुरीच व सिंगापूर हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.