गुरुवार, २३ जून, २०१६

प्रमुख समित्या व आयोग २०१६

प्रमुख समित्या व आयोग २०१६

* न्या. मंजुनाथ आयोग - हा आयोग आंध्रप्रदेश सरकारने कापू या समाजाने नोकऱ्या  शिक्षणामध्ये मागासवर्गीयांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन केले होते. तर सरकारने या समाजाच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी हा आयोग फेब्रुवारी २०१६ मध्ये स्थापन केला आहे.

* पार्थसारथी शोम समिती - ही समिती देशातील कर प्रणालीतील सुलभीकरण अभ्यास करण्यासाठी नेमली होती.

* दिपक मोहंती समिती - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी आर्थिक समावेशकतेसाठी ही समिती स्थापन केली होती.

* राष्ट्रीय शिखर समिती - भारताच्या २०३५ पर्यंत असणाऱ्या तंत्रविषयक गरजा, यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे.

* न्या आर व्ही ईश्वर समिती - ही समिती केंद्रीय आयकर कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नियुक्त केली होती.

* पी के सिन्हा समिती - केंद्र सरकारने ही समिती ७व्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.