रविवार, २६ जून, २०१६

चालू घडामोडी - भूगोल व पर्यावरण

चालू घडामोडी - भूगोल व पर्यावरण 

* देशातील पहिली इथेनॉल मिश्रित प्रदूषणमुक्त बस नागपूर शहरात प्रयोगिक तत्वावर सुरू झाली आहे.

* भारत सरकारने भारताच्या शेजारील सागरी देशांशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने प्रकल्प प्रोजेक्ट मौसम हा प्रकल्प तयार केला आहे.

* पॅराद्वीप ओडिशा येथे भारतातील सर्वात मोठी ऑईल रिफायनरी आहे.

* भारतात सर्वाधिक ई - कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांचा अनुक्रमे क्रम - महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल हे आहेत.

* महाराष्टातील सर्वाधिक ई - कचरा निर्माण करणाऱ्या शहरांचा अनुक्रमे क्रम - मुंबई, नागपूर, पुणे हे आहेत.

* तेलंगणा व महाराष्ट्र सरकार तर्फे गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीवर हे सयुंक्तपणे धरण बांधण्यात येण्यात येणार आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी व गावे जाणार असल्याने या प्रकल्पाला विरोध केला जात आहे.

* सध्या भारतात सौर ऊर्जा निर्मितीत अनुक्रमे राज्यांचा क्रम - राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र हे आहेत.

* केंद्रीय मंत्रालयाने इको सेन्सिटिव्ह झोन [ESZ] मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील उल्कानिर्मत लोणार सरोवर या स्थळाला समाविष्ट केले आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.