बुधवार, १ जून, २०१६

उर्जा संकटाचे प्रश्न - उर्जा संकटाचे निराकरण

१.५ उर्जा संकटाचे प्रश्न 

* खनिज तेलाच्या आयातीवर होणारा वाढता खर्च - आखाती देशांकडून भारतात खनिज तेल आयात होत असल्याने त्या अखाती देशांनी खनिज तेलाच्या किमतीत वाढ केली म्हणजे भारताचा आयतीवरचा खर्च वाढतो.

* परकीय चलन साठ्यावर ताण पडून भारताकडे खनिज तेलासंदर्भात आयातीमधील वाढत्या खर्चामुळे संकट ओढवले आहे.

* मागणी पुरवठ्यातील असमतोल - भारताच्या औद्योगिक विकास आणि कृषी विकास कार्यामध्ये उर्जेची गरज आहे.

* खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि भाववाढीचा दबाव - भारतात येणारे खनिज तेल किमतीने महाग होत असून त्याचा परिणाम वितरणावर होत आहे.

* भारतीय कोळशाचा निकृष्ट दर्जा -  भारतीय कोळशामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असून त्यात कार्बनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तो जळताना त्यातून धूर निघतो आणि उष्णता कमी प्राप्त होते.

* उभारलेल्या उर्जाक्षमतेचा अपूर्ण उपयोग - कमी झाल्यामुळे आजची स्थिती गंभीर बनली आहे. परिणामता भारतात उर्जा संकट समस्याप्रधान झालेले आहे.

 उर्जा संकटाचे निराकरण 

* उत्पादनात वाढ करणे - भारतामध्ये ऊर्जानिर्मितीचे असलेले साठे, नैसर्गिक वायुसाठे, अणुउर्जा इत्यादी समन्वय साधून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे.

* वीजनिर्मितीसाठी खाजगी प्रकल्प - भारतामध्ये उर्जा निर्मिती प्रकल्प कमी असल्याने या क्षेत्रात खाजगी यंत्रणेला व भागीदारीला सहमती देणे आवश्यक आहे.

* विजेची बचत करणे - विजेची बचत करणे म्हणजे एक प्रकारे उर्जानिर्मितीच होय. विजेची बचत झाल्यास उर्जेचे मोठे संकट दूर होईल.

* उपलब्द कोळशाच्या साठ्याचे नियोजन पद्धतीने उत्पादन - भारतामध्ये उपलब्द असलेल्या कोळशाच्या साठ्याचे नियोजन उत्पादन व नियोजनाचा आकार त्यावर ऊर्जानिर्मिती झाली तर संकट दूर करण्यासाठी निश्चित पणे मदत होईल.

*  वीजनिर्मितीमध्ये पर्यायी मार्ग शोधणे - वीजनिर्मिती करताना कोळशाचा वापर करून त्यासोबत नाफ्ता व नैसर्गिक वायू यांच्या वर होणारा खर्च कमी करता येईल.

* पेट्रोलचा पर्याय शोधणे - भारतातील वाहनामध्ये पर्यायी इंधन म्हणून वापर करणे. पेट्रोलऐवजी नैसर्गिक वायूचा वापर करणे तसेच साखर कारखान्यातून इथेनॉलची निर्मिती करणे.

* अणुविद्युत व जलविद्युत यासारख्या उर्जा पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करणे.

* खनिज तेलाचे नियम व व्यवस्थापन कडक करणे, अपारंपरिक उर्जासाधने वाढविणे तसेच संशोधन आणि गतीशीलतेचा उत्पादनाशी संबंध जोडणे आवश्यक आहे.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.