रविवार, १९ जून, २०१६

नैसर्गिक आपत्ती - भूकंप

नैसर्गिक आपत्ती - भूकंप 

* पृथ्वीच्या कवचास, भूपृष्ठास किंवा त्याच्या अंतर्गत भागात जे कंपायमान होते, हादरे बसतात त्या स्थितीस भूकंप म्हटले जाते.

* नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात त्यालाच भूकंप असे म्हणतात. याचाच अर्थ असा कि भूगर्भातील निरनिराळ्या प्रक्रियामधून जी उर्जा निर्मिती होते. तिला कंप सुटतो.

* भौगोलिक दृष्टीने भूकंपाची सर्वाधिक शक्ती ज्या ठिकाणी एकवटलेली असते, त्या ठिकाणापासून भूकंप केंद्र म्हणतात.
भूकंप लहरीची नोंदणी यंत्रावर होते ते यंत्र सायस्मोग्राफ म्हणून ओळखले जातात.

भूकंपमापन 

* भूकंप तरंगाची किंवा लहरीची तीव्रता मोजण्याचे प्रामाण डॉ चार्लर रिश्टर यांनी कालिफोर्निया ऑफ इन्स्टीट्युट टेकनॉलॉजी या ठिकाणी शोधले.

* त्यामुळे भूकंप तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. सामान्यपणे ३.५ तीव्रतेपासून ९.० तीव्रतेपर्यत रिश्टरमध्ये नोंद झालेली आहे.

* भूपृष्ठावर किंवा सर्वात आधी पोहोचणाऱ्या या अत्यंत जलद गतीच्या लहरी आहेत. भुकवचामध्ये ३० किमी खोलीपर्यंत त्यांचा वेग प्रत्येक सेकंदाला ६.५ किमी असतो.

* प्राथमिक लहरीपेक्षा कमी गतीच्या आणि प्राथमिक लहरीनंतर पोहोचणाऱ्या लहरी म्हणजे दुय्यम लहरी होत.

* प्राथमिक व द्वितीय लहरीनंतर येणाऱ्या लहरी भूपृष्ठलहरी या नावाने ओळखल्या जातात. या लहरीचा प्रवास भूपृष्टातून असतो. म्हणून त्यांना जास्त लांब प्रवास करावा लागतो.

जगातील काही प्रमुख भूकंप 

* ३० सप्टेंबर १९९३ मध्ये महाराष्ट्रातील पश्चिम व दक्षिण भागात किल्लारीत भूकंप झाला व त्यात १० हजार लोक मृत्यूमुखी पडले.

* १७ जानेवारी १९९५ मध्ये जपानच्या कोबे शहरात शक्तिशाली भूकंपाने साडेसहा हजार लोक मृत्यूमुखी पडले.

* ३० मे १९९८ उत्तर अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का ४ हजार मृत्यूमुखी.

* २९ मार्च १९९९ उत्तर प्रदेशातील उत्तर काशी व चमोली येथे झालेल्या भूकंपात १०० पेक्षा जास्त मृत्यूमुखी पडले.

* २६ जानेवारी २००१ गुजरातमध्ये ७.९ तीव्रतेचा भूकंप दहा लाख बेघर, ३० हजार लोक मृत्यूमुखी

* ३ मार्च २००२ अफगाणिस्तानच्या भूकंपात १५० लोक मृत्यूमुखी पडले.

* २५ मार्च २००२ अफगाणिस्तानच्या उत्तर भागात धक्के ८०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.

* २४ फेब्रुवारी २००३ चीनच्या पश्चिम भागातील प्रांतांना धक्का २६० जण मृत्यूमुखी पडले.

* १ मे २००३ तुर्कस्तान मध्ये झालेल्या भूकंपाने १६० जण मृत्यूमुखी पडले.

* २१ मे २००३ अल्जेरियाला भूकंपाचा धक्का २००० लोक मृत्यूमुखी पडले.

* २६ डिसेंबर २००३ इराणच्या दक्षिण भागातील भूकंपाच्या धक्क्याने २६ हजाराहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले.

* २४ फेब्रुवारी २००४ मोरोक्कोच्या किनारी भागाला भूकंपाचा धक्का ५०० जण मृत्यूमुखी पडले.

* २६ डिसेंबर २००४ इंडोनेशियात झालेल्या भूकंपाने आलेल्या त्सुनामिने हजारो जणांचे बळी घेतले.

* २२ फेब्रुवारी २००५ इराणच्या केरमान प्रांतात झालेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने शंभर जण मृत्यूमुखी

* २८ मार्च २००५ इंडोनेशियात झालेल्या ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने १३०० लोक मृत्यूमुखी पडले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.