शनिवार, ११ जून, २०१६

भौगोलिक माहितीप्रणाली

३.५ भौगोलिक माहितीप्रणाली 

भौगोलिक माहिती स्वरूप व व्याख्या 

* पृथ्वीवरील निरनिराळ्या ठिकाणांच्या माहितीचे वर्णन करणाऱ्या सांख्यिकीची साठवण करणारी आणि त्या सांख्यिकीचे उपयोजन करणारी प्रणाली म्हणजेच GIS होय.

* भू संदर्भातील अवकाशिक सांखिकी प्राप्त करणे, तिची साठवण करणे, तिचे समाकलन करणे, व्यवस्थितरित्या हाताळणी करणे, पृथकरण करून विश्लेषण मांडणी आणि प्रदर्शन करणाऱ्या साधनांचा संच म्हणजे भौगोलिक माहितीप्रणाली होय.

* GIS मधील भौगोलिक माहितीचा अर्थ पृथ्वीवरील निनिराळ्या ठिकाणांची अवकाशीय माहिती असा आहे.

* या माहितीतंत्र ज्ञानामध्ये पृथ्वीवरील स्थाननिच्शिति दुसंवेदन आणि अन्य भौगोलिक माहितीचा समावेश आहे.

जागतिक स्थितीप्रणाली 

* जागतिक स्थितीप्रणाली GPS म्हणजे जगातील सर्वकष स्वरुपाची स्थिती होय. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही स्थानाची संपूर्ण स्थिती संपूर्ण पृथ्वीच्या किंवा जगाच्या आराखड्याच्या माध्यमातून स्पष्ट होते.

* स्थान हे प्रत्यक्षपणे त्याची दिशा, क्षेत्र, आकार, इत्यादी संदर्भात स्पष्ट होते. जीपीएसमुळे त्रिकोनीकरण सर्वेक्षणाचे तंत्र बदलेले आहे. उपग्रहाच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या योग्य स्थाननिश्चिती होते.

* अवकाश छेद, उपभोगकर्त्याचा छेद या तंत्रातून जीपीएसद्वारा स्थाननिच्शिति होते.

* नौकायाना संदर्भात तर जीपीएसद्वारे उपग्रहीय स्थिती आणि भौगोलिक स्थिती यांची माहिती मिळते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.