गुरुवार, १६ जून, २०१६

क्षेपणास्त्रे

५.७ क्षेपणास्त्रे 

प्रक्षेपण पद्धतीनुसार क्षेपणास्त्र प्रकार 

* जमिनीवरून जमिनीवरील क्षेपणास्त्रे - स्थलसेनेच्या युद्धामध्ये या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा उपयोग केला जातो. या प्रकारात हारपुन, मिनीटम, पिसकीपर, इत्यादीचा समावेश होतो.

* जमिनीवरून हवेतील क्षेपणास्त्रे - जमिनीवरील युद्धात सामन्य पल्ल्याची क्षेपणास्त्रे उपयोगी ठरतात. भारताची आकाश, त्रिशूल, हि याच मालिकेतील क्षेपणास्त्रे आहेत.

* हवेतून हवेतील क्षेपणास्त्रे - विमाने, हेलीकॉप्टर, इत्यादी मधून शत्रूवर मारा करण्यासाठी या प्रकारची क्षेपणास्त्रे उपयोगात आणली जातात.

* हवेतून जमिनीवरील क्षेपणास्त्रे - हवाई युद्धामध्ये आणि जमिनीवरील युद्धामध्ये या प्रणालीतील क्षेपणास्त्रे यांचा उपयोग केला जातो. भारताकडे लेसर, केरी, व करीन ही क्षेपणास्त्रे आहेत.

पल्ल्यावरून क्षेपणास्त्र प्रकार 

* कमी पल्ल्याची स्फोटक क्षेपणास्त्रे - जमिनीवरील युद्धामध्ये किंवा हवाई युद्धामध्ये उपयोगी ठरणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला.

* मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे - सामान्यपणे ५०० ते १५०० सामुद्रिक मैलापासून मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या उपयोगाने युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

* माध्यमिक पल्ल्याची स्फोटके - १५०० ते ५००० किमी सामुद्रिक मैलासाठी परिणामकारक मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे उपयोग युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

* आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्रे - ५००० सामुद्रिक मैलापेक्षा अधिक दूरवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा समावेश या वर्गात केला जातो.

स्थानकानुसार क्षेपणास्त्र प्रकार 

* पाणबुडीवरून व जहाजावरून सोडलेले क्षेपणास्त्र - जमिनीपेक्षा जलपृष्ठभाग मोठा असल्याने रणभूमी म्हणून समुद्री पृष्ठभाग अधिक महत्वाचा आहे. आरमारी युद्धात किंवा नौसेना युद्धामध्ये SLBM हे क्षेपणास्त्रे अतिशय महत्वाचे शस्त्र आहे.

* क्रुझ क्षेपणास्त्र - आजच्या अस्त्रामध्ये हे अतिशय अत्याधुनिक आणि विस्मयकारी अस्त्र आहे. प्राचीन काळातील ब्रम्हास्त्र प्रमाणेच ते आहे. एकदा मार्ग आखून दिला कि निर्धास्तपणे शेकडो किलोमीटर अंतर अल्पावधीत ते कापते. जमिनीच्या उंच सखल भागानुसार क्रुझ आपले अंतर कमी जास्त करते. क्रुझ क्षेपणास्त्र याचे वजन १,२०० किमी व लांबी ६.४ मीटर असते. १००० तशी वेगाने हे क्षेपणास्त्र २,४०० किमी अंतर सहजपणे तोडू शकते.

* लान्स क्षेपणास्त्र - टक्टीकल गटातील या क्षेपणास्त्र यांच्याद्वारे न्यूट्रोन बॉम्बचा उपयोग करण्यात येतो. या क्षेपणास्त्र यांच्या मदतीने १३० किलोमीटर अंतरापर्यंत न्युट्रोन बॉम्ब फेकता येतो. या क्षेपणास्त्राद्वारे ४० ते १०० किलो टनाची क्षमतेची अण्वस्त्रे प्रक्षेपित करता येतात.

* MX क्षेपणास्त्र - स्ट्रेटेजिकल क्षेपणास्त्र मालिकेतील हे क्षेपणास्त्र रामायणातील दिव्य बाणाप्रमाणेच आहे. अतिशय अवाढव्य अशा या क्षेपणास्त्राचे वजन एक लाख पौंड असते. ७१ फुट लांबीच्या या क्षेपणास्त्रावर व्यास ७.७ फुट एवढा असतो.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.