रविवार, २६ जून, २०१६

विकास योजना व उपक्रम २०१६

विकास योजना व उपक्रम २०१६

* उदय योजना - ही योजना केंद्र सरकारने ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जाहीर केली आहे.  या योजनेत DELF - डोमेस्टिक इफिशियंट लाईटनिंग प्रोग्राम च्या अंतर्गत एलईडी बल्प देण्यात येणार आहेत.

* ८ एप्रिल २०१५ रोजी नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजना सुरू केली या अंतर्गत कर्जप्रकरण करताना प्रक्रियाशुल्क आकारले नाही तसेच कर्ज परतफेडीची मुदत ५ वर्षाची राहील.

* देशातील तरुणांना उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्ट अप इंडिया मोहीम १६ जानेवारी २०१६ या रोजी सुरू केली. यात समाविष्ट नवीन उद्योगांना ३ वर्षासाठी प्राप्तीकरात सूट तसेच भांडवली नफ्यावर सूट देण्यात येईल.

* २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या योजनेअतर्गत केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना ही देशातील दुर्बल व गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना ३० ते ६० चौ मी क्षेत्रफळ पर्यंत नवीन घर बांधणे किंवा जुन्या घराची वाढ करणे या साठी अत्यल्प व्याजदराने ६ लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.