मंगळवार, २८ जून, २०१६

महाराष्ट्र : अर्थव्यवस्था, सहकार, शिक्षण

महाराष्ट्र : अर्थव्यवस्था, सहकार, शिक्षण 

* देशातील अन्य भागाप्रमाणेच राज्याची अर्थव्यवस्था ही कृषिकेंद्रित होती, कृषी उत्पादन व हस्तव्यवसाय ही तेव्हाचे उद्योगधंदे होते.

* ब्रिटिश कालावधीत मुंबई, सोलापूर, नागपूर येथे वस्त्रोद्योग विकसित झाला. विदर्भात खान उद्योगाचा प्रारंभ झाला.

* मुंबईत १८७५ मध्ये भारतातील पहिला शेअर बाजार स्थापन झाला.

* राज्यात सहकार कारखान्याचा विकास सर्वात जास्त झाला झाला. याशिवाय बँका, सूतगिरण्या इत्यादी सर्व सहकारामुळेच शक्य झाले.

* मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे या भागातच उद्योग जास्त प्रमाणात उभे राहिले.

* औद्योगिक विकासात तसेच भांडवल आकर्षित करण्यात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.

 महाराष्ट्र : सहकार क्षेत्र 

* देशातील पहिला सहकारविषयक कायदा १९०४ मध्ये संमत करण्यात आला. जुन्या मुंबई राज्यात १९२५ मध्ये सहकार कायदा करण्यात आला.

* सहकार क्षेत्राचे प्रणेते - गोपाळ कृष्ण गोखले, वैकुंठलाल मेहता, चुनीलाल मेहता, रमणभाई सरय्या, जि के देवधर, विठ्ठलदास ठाकरसी, ध रा गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंत दादा पाटील, रत्नप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे पाटील, शरद पवार, बिंदूभाऊ जोशी.

* देशातील पहिली सहकारी सूतगिरणी - कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी.

* भारतातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी - डेक्कन को - ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल इचलकरंजी

* राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक - सोलापूर

* देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत - इचलकरंजी

* महाराष्ट्रातील पाहिला साखर कारखाना - प्रवरानगर जि. अहमदनगर

* आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना - शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली.

* लष्करातील जवानांसाठी एकमेव सहकारी बँक - सातारा.

* महाराष्ट्रातील पाहिले सहकारी डिपार्टमेंट स्टोर - अपना बाजार, मुंबई

* महाराष्ट्रतील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था - शारदाश्रम मुंबई

* महाराष्ट्रतील पहिली सहकारी बँक - दि शामराव विठ्ठल को बँक मुंबई

* महाराष्ट्रातील व देशातील पहिली धान्य बँक - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे १९६० मध्ये स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रातील विद्यापीठे 

* मुंबई विद्यापीठ - १८५७

* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, मुंबई [ महिलांसाठी ] - १९१६

* टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे - १९२१

* राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर - १९२३

* पुणे विद्यापीठ - १९४८

* डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - १९५८

* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - १९६३

* संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती - १९८३

* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक - १९८८

* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव - १९९०

* डॉ बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे महाडजवळ - १९९०

* स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड - १९९४

* श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे - १९९६

* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक - १९९८

* महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर २०००

* भरती विद्यापीठ समकक्ष पुणे

* महिला मुक्त विद्यापीठ - मुंबई

* महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ - रामटेक

कृषी विद्यापीठे 

* महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर - १९६८

* पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला - १९६९

* डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली रात्नागीरी - १९७२

* मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - १९७२

* पाहिले कृषी महाविद्यालय, पुणे - १९०८

उच्च शिक्षण संस्था 

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई - मुंबई

* गोखले अर्थशात्र संस्था - पुणे

* डेक्कन कॉलेज - पुणे

* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई

* इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज, चेंबूर - मुंबई

* भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे

* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई

* राज्य शिक्षणशास्त्र संस्था - पुणे

* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट - पुणे

* इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड अस्ट्रोफिजिक्स  - पुणे 

* नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज - नागपूर

* आधारकार रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे

* इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट - मुंबई

* नॅशनल इन्शुरन्स अकेडमि - पुणे

* आदिवासी संशोधन संस्था - पुणे

* श्री शिवाजी लोककला विद्यापीठ - अमरावती







 




 
 

























0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.