बुधवार, १५ जून, २०१६

मुंबई नागपूर सुपर एक्सप्रेस महामार्ग २०१६

मुंबई नागपूर सुपर एक्सप्रेस महामार्ग २०१६

* भाजप सरकारने मुंबई ते नागपूर या ७४४ किलोमीटर लांबीच्या व १२० मीटर रुंदी असलेल्या आठपदरी रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

* सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार ८० किमी ताशी वेगाने मुंबई ते पुणे दरम्यान गाड्या धावतात. परंतु या कायद्यानुसार १५० किमी प्रतीतास नुसार या महामार्गावरून गाड्या धावतील.

* या महामार्गाने मुंबई ते नागपूर हे अंतर फक्त ६ तासात पार होऊ शकेल. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर पासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.

* या प्रकल्पाचे काम सहा टप्प्यात पूर्ण होणार असून २०१९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्यात येईल.

* या प्रकल्पासाठी लागणारी जमीन आंध्रप्रदेश या राज्याच्या धर्तीवर land pulling या द्वारे करण्यात येईल. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून जमीन द्यायची असून ज्या ठिकाणी शहर किंवा इतर क्षेत्र विकसित केले जाणार आहे त्यांना २० ते २५% जमिनीत भागीदारी देण्यात येईल.

* जे शेतकरी जमीन देण्यास नसतील त्यांची जमीन महामार्ग कायद्यानुसार संपादित करण्यात येईल. तसेच बागायतदार शेतकर्यांना ५० ते ६० हजार वार्षिक हेक्टरी मदत दिली जाईल.

* हा प्रकल्प ३०,०००  हजार कोटीचा आहे, ३० हजार हेक्टार जमीन संपादित करण्यात येईल. मुंबई ते नागपूर ७४४ किमी १२०  रुंद आठपदरी महामार्ग.

* विमान उतरवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महामार्गावर धावपट्टी, महामार्गावर २२ जिल्हे जोडले जाणार, २२ ठिकाणी इंटरचेंज पोल राहणार.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.