सोमवार, १३ जून, २०१६

जैवतंत्रज्ञान स्वरूप

४ जैवतंत्रज्ञान - Biotechnology 

जैवतंत्रज्ञान स्वरूप 

* जीवशास्त्रावर आधारित जैवतंत्रज्ञानांमुळे मानवी जीवनाचा विकास तर झालाच आहे. त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासही मदत केलेली आहे.

* जीवशास्त्र म्हणजे सजीवांचा अभ्यास होय. यातील बायोस म्हणजे जीव व लोगोस म्हणजे अभ्यासक्रम होय. जीवाच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणजे जीवशास्त्र होय.

* जीवशास्त्रातील श्लायडेन हा वनस्पती शास्त्रज्ञ तर थिओडोर श्वान प्राणीशास्त्रज्ञ होय.

* मानवी शरीरात ४०० स्नायू असतात. पुरुषांच्या वजनाच्या ४०% आणि स्त्रियांच्या वजनाच्या ३०% असतात.

* मेंदूच्या पृष्ठभागावरील चेतापेशींची संख्या १००० दशलक्ष असते. सर्वात लहान पेशी म्हणजे मायकोप्लास्मा गलीसेप्टीअम [०.१mm] आहे.

* सर्वांत मोठी पेशी - शहामृगाचे अंडे होय. [ १८ सेमी ]. मानवी शरीरातील काही चेतापेशींना १ मीटर लांबीचे शेपूट किंवा अक्षतंतू असतो.

* सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात. सर्व पेशींना उदय अस्तित्वात असलेल्या पेशीपासून होतो. म्हणजेचे कोणत्याही पेशीचा उगम उत्स्फ्रूर्तपणे होत नसून केवळ पेशी विभाजनाचे त्या निर्माण होतात.

* पेशी हा सजीवाचा मुलभूत घटक आहे. प्रत्येक जीव स्वतःचे जीवन एक पेशी म्हणून सुरु करतो. अंडे आणि अमिबा दोन्ही एकपेशीय आहेत.

* एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

* उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचा उपयोग करून आवश्यक उर्जा पुरवितात.

उती संबधित मुद्दे

* प्ररोह विभाजी उती ही खोडाच्या आणि मुळाच्या अग्रभागाशी असतात. त्यामुळे मूळ खोडाची लांबी वाढते.

* अंतरीय विभाजी उती ही पानाच्या तळाशी व फांदीच्या तळाशी असते. विभाजी उतीच्या पेशीविभाजनामुळे स्थायी उती तयार होतात. स्थायी उती या सरल स्थायी उती किंवा जटील स्थायी उती असतात.

* मुल उती बटाटा व बीट यासारख्या वनस्पतीत अन्न साठविण्याचे कार्य करतात.

* जलीय वनस्पतीमध्ये आंतरपेशीय पोकळ्यामध्ये हवेच्या पोकळ्या तयार होतात. त्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्याची क्षमता प्रदान करतात. म्हणून त्यांना मुल उती वायू उती म्हणून संबोधल्या जातात.

* पानांच्या देठात आढळणाऱ्या स्थूल उटी वनस्पतींना यांत्रिक आधार देण्याचे कार्य करतात. स्थुलकोन उतीमधील पेशी जिवंत आणि लांबट असून त्यात केंद्रक असते.

* खोड, संवहनी पूल, पानांच्या शिरा, बियांच्या कठीण कवचात दृढ उती असतात. त्यातील पेशी मृत असतात. व त्या लांबट आणि आखूड असतात. लिग्नाईटच्या थरामुळे त्यांच्या पेशिभित्तिका जाडसर बनतात.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.