शनिवार, २५ जून, २०१६

सामान्य ज्ञान २०१६ - भाग १

सामान्य ज्ञान २०१६ - भाग १ 

* अणुऊर्जा निर्मितीत भारताचा जगात १३ वा क्रमांक लागतो.

* पंतप्रधान पिक विमा योजना जून २०१६ पासून लागू केली जाईल.

* सांडपाण्याचा वापर करून कोरडी नागपूर येथील औष्णिक ऊर्जा निर्मिती करणारे भारतातील पाहिले औष्णिक ऊर्जा केंद्र ठरले.

* पाकिस्तान संसद ही जगातील सौरउर्जेवर चालणारी पहिली संसद ठरली.

* महाराष्ट्राला केंद्र सरकारचा २०१५-१६ साठीचा तेल व वायू संवर्धनासाठी पहिला पुरस्कार मिळाला.

* आसाम राज्यात सुरू करण्यात आलेले खनिज शुद्धीकरण प्रकल्प नुमलिगड रिफायनरी होय.

* बाघमारा सोन्याची खान जि. बालोदा छत्तीसगढ ही भारतातील पहिली लिलाव झालेली सोन्याची खान ठरली आहे.

* भारतातील पहिली ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी औरंगाबाद जवळ उभारली जात आहे त्याला ऑरिक सिटी असे म्हणतात संक्षिप्त रूप औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी असे होय.

* महाराष्ट्रात जालना व वर्धा या ठिकाणी ड्राय पोर्ट स्थापन केला जाणार आहे, ड्राय पोर्ट म्हणजे मालवाहतूक त्या ठिकाणी एकत्रित करण्यासाठी असेलली सुनियोजित जागा ज्यामध्ये विविध सोयी उपलब्द असतात.

* गुजरात मध्ये अह्मदाबादजवळ गिफ्ट सिटी उभारली जात आहे गिफ्ट सिटी म्हणजे गुजरात इंटर नॅशनल फायनान्स टेक सिटी असे त्याचे नाव आहे.

* महिलांना पोलीस भरतीमध्ये ३३% आरक्षण देणारे राज्य गुजरात आहे.

* झिका विषाणू सर्वप्रथम युगांडा देशात १९४७ साली सापडला त्याचा सर्वात जास्त फटका ब्राझील या देशाला बसला. या विषाणूमुळे बालकांना मायक्रोफोली हा रॊग होतो, व मातेचा गर्भावस्थेत बालकाची अपुरी वाढ होते.

* झिका विषाणूचा पहिला प्रसार २०१५ मध्ये ब्राझील या देशात झाला व एड्स इजिप्ती या डासामुळे झिका हा विषाणू पसरतो.

* सिद्धार्थ जाधव हा अभिनेता महाराष्ट्र शासनाने दारूबंदी प्रचार मोहिमेसाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून त्याची निवड केली आहे.

* २६ जानेवारी २०१६ चे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष फ्रान्सवा ओलांद हे होते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.