सोमवार, २७ जून, २०१६

चालू घडामोडी - संरक्षण २०१६

चालू घडामोडी - संरक्षण २०१६

* ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत व रशिया या दोन देशांनी संयुक्तपणे विकसित केले आहे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किमान १५ ते २९० किमी आहे.

* IFR - इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू २०१६ आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळा विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला होता.

* आयएनएस अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी आहे, या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ७०० किमि आहे.

* २५ जानेवारी २०१६ रोजी केंद्र सरकारने शौर्य पुरस्कार जाहीर केले अशोक चक्र - लान्स नायक मोहन नाथ गोस्वामी मरणोत्तर तर शौर्य चक्र कर्नल संतोष महाडिक मरणोत्तर यांना मिळाला आहे.

* भारताचे भूदल प्रमुख जनरल दालबीरसिंग, भारताचे हवाई दलप्रमुख अरुप राहा, नौदल प्रमुख रॉबिन धवन हे आहेत.

* भारतातील पाहिले डिफेन्स इंडस्ट्रियल पार्क केरळ राज्यात स्थापन करण्यात येणार आहे.

* भारताचे लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे लष्कर म्हणून संबोधले जातात.

* आयएनएस विराट जगातील सर्वात अधिक काळ नौदल सेवेत असणारी भारतीय विमानवाहू युद्धनौका आहे.

* तनुश्री पारीख ही सीमा सुरक्षा दल \ बीएसफ \ बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मधील प्रथम महिला अधिकारी ठरली.     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.