सोमवार, १३ जून, २०१६

हरित क्रांती व पर्यावरण

४.१० हरित क्रांती व पर्यावरण 

हरितक्रांती विकास

* हरित क्रांतीचे जनक नोबेल परीतोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांच्या कल्पनेतून हरित क्रांती हि नवीन शेतीची पद्धती १९६० साली उदयास आली आहे. 

* अमेरिकन कृषी शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या हायब्रीड बियाणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बदल झालेला आहे. व कृषी उत्पादन हरित क्रांतीमुळे एकदम वाढले. 

* अधिक उत्पादन देणारी बियाणे जशी गहू, भात, मका, बाजरी, ज्वारी, इत्यादी संशोधित बियाणे यांच्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

* प्रमाणित बी हे भरपूर उत्पादन देते, त्यामुळे भारतात आज १०००० हजार पेक्षा जास्त बीज गुणन केंद्रे स्थापन करण्यात आली आहे. 

* रासायनिक खते - जगातील बहुतेक भागात वर्षानुवर्षे शेतीसाठी जमिनीचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादनवाढ झालेली आहे. 

* लघुसिंचन योजना - भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विविध सरकारी लघुसिंचन योजना राबविल्या त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. 

* दुबार पिके घेणे ज्या भागात जलसिंचनाच्या सुविधा आहेत यासाठी दुबार, तिबार पिके घेणे. 

* विविध रासायनिक जंतुनाशके व तननाशके यांच्या वापरामुळे रोपांचे संरक्षण करण्यात आले. 

* भूमी संवर्धन - हरित क्रांतीच्या इतर तत्वाबरोबरच भूमी संवर्धन हे महत्वाचे आहे.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.