शनिवार, ११ जून, २०१६

दूरसंवेदन

३.६ दूरसंवेदन 

* दूरसंवेदन म्हणजे एखादी वस्तू व तिचा परिसर याबद्लचा तपशील, त्या वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता दुरूनच मिळवण्याच्या निरनिराळ्या तांत्रिक पद्धती होय.

* दुरसंवेदाचा प्रमुख उद्देश आपल्या आजूबाजूचा परिसर, पृथ्वीवरील किंवा भूगर्भातील नैसर्गिक संपत्ती आणि पृथ्वीभोवतालचे वातावरण यांची सविस्तर माहिती मिळविणे हा असतो.

* माहिती मिळवण्याच्या या पद्धतीमध्ये विद्युत चुंबकीय तरंग आपला दृश्य भाग हा या तरंगाचा एक भाग असतो. हि माहिती प्रामुख्याने तरंग लांबी व तरंगाची तीव्रता यांच्या बदलाच्या रुपात साठविलेली आहे.

दुरसंवेदनाची उपयुक्त क्षेत्रे 

* भूपृष्ठरचना भूगर्भशास्त्र - दूरसंवेदन यांचा उपयोग करून खनिजसंपत्तीचे साठे शोधणे सुलभ झालेले आहे. भुप्रूष्टांची रचना  भूगर्भाची माहिती मिळवण्यासाठी दूरसंवेदनाचा वापर केल्या जातो.

* हवामानशास्त्र - हवामानविषयक माहिती मिळवणाऱ्या उपग्रहात पृथ्वीच्या वातावरणाची नोंद घेवू शकणारे अनेक संवेदक बसविलेले असतात. ते संवेदक प्रतिमादर्शक किंवा प्रतिमाविरहीत सिग्नल्स पाठविणारे आहे.

* वनस्पतीशास्त्र - भूपृष्टीय पाहणीच्या पद्धतीने अवकाशयानातून केलेल्या चित्रणाचा उपयोग वनस्पती शास्त्रासाठी होतो. विशेषता जंगलाच्या व पिकांच्या पाहणीसाठी त्याचा मोठा उपयोग होतो.

* लोकसंख्या - लोकसंख्येच्या अभ्यासासाठी व पाहणीसाठी दुरसंवेदनाचा उपयोग करून घेण्यात येतो. मानवी श्रमाचा उपयोग करून केलेल्या लोकसंख्येची क्षेत्रीय विभागणी कशी झालेली आहे याचा अभ्यासही दूरसंवेदनेद्वारे होत असतो.

* खनिजसंपत्ती - देशाच्या आर्थिक विकासासाठी खनिजांची आवशक्यता असते. देशातील खनिज संपत्तीची माहिती उपलब्द करून घेण्याचे तंत्र दूरसंवेदन तंत्रामध्ये आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.