मंगळवार, २८ जून, २०१६

महाराष्ट्र - राज्यव्यवस्था व शासनव्यवस्था

महाराष्ट्र - राज्यव्यवस्था व शासनव्यवस्था 

महाराष्ट्र : स्थापना [इतिहास] 

* इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सातवाहन राजवंशापासून सुरू होतो. ब्रिटिश कालखंडात मराठी भाषिक लोक मुंबई प्रांत, मध्यप्रदेश,  हैदराबाद संस्थांनात विखुरलेला होता. तसेच गोवा व गोमंतक, दादरा नगर हवेली, हा मराठी भाषिक मुलुख पोर्तुगीज अमलाखाली होता.

* पुढे १९५५ साली मराठी व गुजराती द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती सुचवली, त्यानुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी हे राज्य अस्तित्वात आले.

* १९१५ मध्ये लोकमान्य टिळकांनी सर्व मराठी भाषक प्रदेश एकत्र आणण्याची व प्रांताची भाषावार पुनर्रचना करण्याची मागणी केली.

* नागपूर करार - १९५३ मध्ये प्रमुख मराठी भाषक नेते नागपूर येथे जमले. त्यांनी राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर करायचा संयुक्त महाराष्ट्राचा प्रस्ताव तयार केला. या संदर्भात जो मसुदा तयार करण्यात आला. त्याला नागपूर करार असे म्हणतात.

* संयुक्त महाराष्ट्र आंदोलन - १९५५ साली महाराष्ट्र, गुजरात, मुंबई स्वतंत्र राज्य, निर्माण व्हावे असा प्रस्ताव पुढे आला. यावर मुंबई शहर केंद्रशासित प्रदेश असा प्रस्ताव केंद्र शासनाने घोषित केला.

* त्यावर १०५ लोकांनी या निर्णयामुळे आपले बलिदान दिले. म्हणून त्यांना हुतात्मे म्हणून संबोधले जाते.

* संयुक्त महाराष्ट्र समिती - १९५६ साली सर्व काँग्रेस पक्ष एकत्र आले व त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली.

* शेवटी गुजरात व महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची निर्मिती करण्यात आली, मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली.

 महाराष्ट्रातील राष्ट्रीय राजकीय पक्ष 

* इंडियन नॅशनल पक्ष - हा पक्ष १८८५ मुंबई मध्ये स्थापन झाला.

* राष्ट्रवादी काँग्रेस - मूळ इटालयीन असलेल्या सोनिया गांधी यांना शरद पवार, संगमा, अन्वर तारिक यांचा विरोध होता. तर शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

* भारतीय कम्युनिस्ट पक्ष - या पक्षाची स्थापना १९२५ साली झाली.

* मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष - आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत फूट पडून १९६४ मध्ये या पक्षाची स्थापना केली.

* समाजवादी पक्ष - १९४८ मध्ये समाजवादी पक्ष स्थापन केला.

* भारतीय जनता पक्ष - भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ मध्ये झाली. जनता पक्षाच्या फुटीनंतर मूळच्या जनसंघाच्या लोकांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली.

* शिवसेना - १९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.

* भारतीय रिपब्लिकन पक्ष - १९५७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी या पक्षाची स्थापना केली.

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष

* शेतकरी कामगार पक्ष - १९४८ मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली.

* महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष - या पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली.

* शेतकरी संघटना - १९७८, अखिल भारतीय किसान सभा - १९३६

महाराष्ट्रातील शासनव्यवस्था

* महाराष्ट्राचे विधिमंडळ - महाराष्ट्राचे विधिमंडळ द्विगृही आहे, विधानसभा सदस्य संख्या २८९ एवढी आहे. विधान परिषद सदस्य संख्या ७८ एवढी आहे.

* विधिमंडळाची रचना - महाराष्ट्र विधिमंडळाची उन्हाळी व पावसाळी अधिवेशन राज्याची राजधानी मुंबईत भारतात व हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे भरते.

* विधिमंडळाचा सचिव याची नेमणूक राज्यपाल करतो.

* महाराष्ट्राची विधानसभा -  एकूण सदस्य संख्या २८९ आहे [ २८८ निर्वाचित सदस्य व १ राज्यपालाने नियुक्त केलेल्या अँग्लो इंडियन जमातीचा सदस्य ] असतो. याचा कालखंड सर्वसाधारणपणे ५ वर्षाचा असतो. विधानसभा सद्यसामधून विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी सभापती व उपसभापती यांची निवड केली जाते.

* महाराष्ट्र विधान परिषद - एकूण सद्यस्य संख्या ७८ आहे. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. प्रत्येक सदस्यांची मुदत ६ वर्षे असते. सदस्यामधूनच विधान परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते.

महाराष्ट्रातील प्रशासन 

* प्रशासकीय विभाग - राज्यकारभाराच्या सोयीसाठी ३७ विभाग किंवा खाती निर्माण करण्यात आली. महत्वाच्या खात्याच्या प्रमुखपदी कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो.

* मुख्य सचिव - महाराष्ट्र शासनातील मुख्य सचिव हा शासनातील सर्वोच्च अधिकारी असतो.

* मुख्य माहिती आयुक्त - केंद्रीय माहिती अधिकार कायद्यानुसार २००५ साली महाराष्ट्रातून मुख्य माहीती आयुक्त यांची निर्मिती करण्यात आली.

* पोलीस महासंचालक - राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी आहे.

* पोलीस आयुक्त - प्रत्येक विभागानुसार पोलीस आयुक्त हा अधिकारी असतो.

* जिल्हा पोलीस अधीक्षक - जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक हा अधिकारी असतो.

महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था 

* महाराष्ट्रातील उच्च न्यायालय मुंबई येथे आहे.

* उच्च न्यायालयाची खंडपीठे - नागपूर, औरंगाबाद, व पणजी या ठिकाणी आहेत.

* कुटुंब न्यायालये - मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे येथे आहे.

* प्राधिकरण न्यायालये - भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत तंटे सोडविण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे येथे न्यायालये आहेत.

* बालगुन्हेगारीसाठी मुंबई येथे न्यायालय आहे.

महाराष्ट्रातील केंद्राच्या अखत्यारीतील संशोधन संस्था 

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटीऑरॉजी - पुणे

* सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला - पुणे

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई

मध्यवर्ती संशोधन संस्था 

* वुल रिसर्च असोसिएशन - मुंबई

* नॅशनल केमिकल लेबॉरेटरी - पाषाण पुणे

* मुंबई टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन - मुंबई

* नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट - नागपूर

* ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया - पुणे

संरक्षण मंत्रालयाने चालविलेल्या संस्था 

* इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी - पुणे

* आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट - पुणे

* एक्सप्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलोपमेंट लॅबोरेटरी - पुणे

* रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनिअर्स - दिघी पुणे

* नेव्हल केमिकल अँड मेटॉलॉजिकल लॅबोरेटरी - मुंबई

* हाय एनर्जी मटेरियल रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट एस्टॅब्लिशमेंट - अहमदनगर

अणुसंशोधन संस्था 

* भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर - मुंबई

* इंडियन रेअर अर्थ लिमिटेड - मुंबई

* टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च - मुंबई

* ऍटोमिक पॉवर प्लॅन्ट - तारापूर - ठाणे

* न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड - मुंबई

अणुक्षेत्रातील अनुदानित संशोधन संस्था 

* सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स - मुंबई

* टाटा मेमोरियल सेंटर - मुंबई

* ऍटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटी - मुंबई

* बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्सेस - मुंबई

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन संस्था 

* नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट [ NARI ] - भोसरी

* आय. सी. एम. आर. जेनेटिक रिसर्च सेंटर - मुंबई

* इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी - पुणे

* इंट्रोव्हायरस रिसर्च सेंटर - मुंबई

* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे

* हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई

* इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसिन - मुंबई

* जसलोक रिसर्च सेंटर - मुंबई

* रिजनल कॅन्सर सेंटर - टाटा मेमोरियल हॉस्पिटल - मुंबई

* इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन - मुंबई

* ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन - मुंबई

* इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई

* कुत्रिम अवयव केंद्र - वानवडी पुणे

भारतीय कृषी संशोधन संस्था 

* कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी, मुंबई

* नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड युज प्लॅनींग - नागपूर

* सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च - नागपूर

* सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन - मुंबई

* नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सिट्स - नागपूर

* नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स - पुणे

प्रशिक्षण संशोधन संस्था 

* आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट - पुणे

* भारत इतिहास संशोधन मंडळ - पुणे

* फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट - पुणे

* भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे

* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था - पुणे

* भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन - उरळी कांचन - पुणे

* मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी - मुंबई

* टेक्सटाईल इन्स्टिट्युट, इचलकरंजी - कोल्हापूर

सैनिकी प्रशिक्षण संस्था 

* आय एन एस हमला मालाड - मुंबई

* आय एन एस राजेंद्र - मुंबई

* कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग खडकी - पुणे

* आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज - पुणे

* नॅशनल डिफेन्स अकेडमी खडकवासला - पुणे

* आय एन एस शिवाजी - लोणावळा

* स्कुल ऑफ आर्टिलरी - देवळाली नाशिक

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था 

* महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था जिल्हा, तालुका, गाव या तीन पातळ्यांवर १९६२ मध्ये अस्तित्वात आहे.

* महाराष्ट्रात ३३ जिल्हा परिषदा आहेत, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत.

* महाराष्ट्रात एकूण ३५५ तालुके आहेत, व ३५१ पंचायत समित्या आहेत.

* महाराष्ट्रात एकूण २६ महानगरपालिका आहेत. तसेच ७ कटक मंडळे, ५ नगर पंचायती व २२१ नगरपालिका व नगरपरिषदा आहेत.

महाराष्ट्रातील पंचायत राज - ग्रामपंचायत

* बलवंतराय मेहता समितीने पंचायत राज ही व्यवस्था ग्रामीण प्रशासनासाठी स्वीकारली व त्याची अंमलबजावनी १९५९ पासून सुरू झाली.

*  पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात तळातील स्तर म्हणजे ग्राम पंचायत होय. १०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी ग्रामपंचायत असते. तर ३०० ते ५०० लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत असते.

* ग्रामपंचायत सदस्यसंख्या ही गावातील लोकसंख्येवर अवलंबून असते. १५०० किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या ७ सदस्य, १५०१ ते ३००० लोकसंख्या ९ सदस्य, ३००१ ते ४५०० लोकसंख्या ११ सदस्य, ४५०१ ते ६००० लोकसंख्या १३ सदस्य संख्या, ६००१ ते ७५०० लोकसंख्या - १५ सदस्य संख्या, ७५०१ व त्याहून अधिक १७ सदस्यसंख्या असते.

* राखीव जागा - एकूण जागेपैकी १\३ जागा स्त्रियांसाठी, अनुसूचीत जाती व जमातीसाठी राखीव असलेल्या स्त्रियांसाठी १\३ जागा समाविष्ट असतात. याशिवाय इतरमागास वर्गीयासाठी ग्रामपंचायतीसाठी २७% जागा राखीव असतात.

* ग्रामपंचायत सदस्य प्रौढ मतदान पद्धतीने निवडले जातात. पंचायत सदस्य होण्यासाठी २१ वर्षे पूर्ण वयाची अट आहे. ग्रामपंचायतीची मुदत ५ वर्षे आहे.

* ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंचाची व उपसरपंचाची निवड होते.

* सभा - ग्रामपंचायतिला दरमहा कमीत कमी एक सभा बोलावणे बंधनकारक आहे. सभेसाठी निम्यापेक्षा जास्त उपस्थिती आवश्यक असते.

* ग्रामपंचायतीची कामे - स्वछता, आरोग्य, पाणीपुरवठा, व दिवाबत्ती या नित्याच्या तर इतरही महत्वाची कामे असतात.

* सरपंचाची कामे - मासिक सभा बोलाविणे, ठरावांची कार्यवाही करणे, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक काढणे, यासारखी कामे करावी लागतात.

* ग्रामसेवक - ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून तो पंचायतीचा कारभार पाहतो. तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची निवड करतात.

* ग्रामपंचायत उत्पन्नाची साधने - जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, अनुदान ही शासकीय अनुदाने, कर - घरपट्टी, दिवाबत्ती, पाणीपट्टी, आरोग्य कर, बाजार कर, करमणूक कर असतो.

पंचायत समिती 

* पंचायतराज व्यवस्थेतील दुसरा स्तर म्हणजे पंचायत समिती होय. ही ग्राम पंचायत व जिल्हा परिषद यांचा दुवा असते.

* निवडणूक - प्रौढ मतदान पद्धतीनुसार पंचायत समिती सदस्यांची निवड होते त्याचे कार्यक्षेत्र हे तालुक्यातील सर्व गावे असतात.

* पंचायत समिती सदस्य संख्या किमान १५ व कमाल २१ असते. राखीव जागांच्या नियमानुसार अनुसूचित जाती व जमाती तसेच स्त्रिया यांच्यासाठी राखीव जागा असतात.

* पंचायत समितीचा कार्यकाळ ५ वर्षे असतो. सभापती व उपसभापती यांची निवड निवडून आलेले सभासद करतात. सभापती व उपसभापती यांना दरमहा मानधन व अन्य सवलती मिळतात.

*  सभापतीची कामे - सभा बोलाविने, ठराव व निर्णयाची कार्यवाही करणे, प्रशासनावर देखरेख ठेवणे.

* गटविकास अधिकारी - तालुका पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तो पंच्यात समितीचा कारभार पाहतो तर ग्रामपंचायतीवर देखरेख करतो.

* पंचायत समितीची कामे - विकास कामांची आखणी करणे, जिल्हा परिषदेची कामे सोपविलेली कामे पार पडणे.

जिल्हा परिषद 

* पंचायतसमितीचा सर्वात वरचा स्तर म्हणजे जिल्हा परिषद होय. महाराष्ट्रात ३३ जिल्हा परिषदा आहेत.

* कार्यक्षेत्र - संपूर्ण जिल्हा यावर जिल्हा परिषद यावर नियंत्रण ठेवते. नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्र यांच्यात येत नाही.

* निवडणूक - प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने जिल्हा परिषद सदस्यांची निवड करतात.

* जिल्हा परिषद सदस्यसंख्या किमान ५० व कमाल ७५ असते.

* जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा ५ वर्षाचा असतो.

* जिल्हा परिषद अध्यक्ष - यांची निवड जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य करतात. जिल्हा परिषद अध्यक्षाला राज्यमंत्राचा दर्जा असतो.

* अध्यक्षाची कामे - जिल्हा परिषदेची सभा बोलावून त्या चालवणे कारभारावर देखरेख ठेवणे. परिषदेचे ठराव व निर्णय यांची कार्यवाही करणे.

* मुख्य कार्यकारी अधिकारी - जिल्हा परिषदेच्या प्रशासन प्रमुखाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेतून केली जाते.

* जिल्हा परिषदेचे अन्य घटक - जिल्हा आमसभा, जिल्हा नियोजन मंडळ, व जिल्हा परिषदा समित्या, [ स्थायी समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती असते.

* जिल्हा परिषदेचे कामे - जनतेला आवश्यक त्या सेवा सुविधा पुरविणे, राज्य शासनाची दिलेली कामे करणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या विकासाची कामे करणे.

* जिल्हा परिषदेचे उत्पन्न साधने - शासनाकडून मिळणारे ७५% अनुदान मिळते. जिल्ह्यातील महसुलातील ७०% रक्कम एवढे अन्य अनुदान मिळते. कर्मचाऱ्यांसाठी वेतनासाठी ७५% अनुदान मिळते. याशिवाय कर, शुल्क, इमारत भाडी इत्यादी उत्पन्नाची साधने मिळतील.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 

* यशवंतराव चव्हाण - १९६०-६२

* मारोतराव कन्नमवार - १९६२-६३

* वसंतराव नाईक - १९६३-७५

* शंकरराव चव्हाण - १९७५-७७

* वसंतदादा पाटील - १९७७-७८

* शरद पवार - १९७८-८०

* अ. र. अंतुले - १९८०-८२

* बाबासाहेब भोसले - १९८२-८३

* वसंतदादा पाटील - १९८३-८५

* शिवाजी पाटील - निलंगेकर - १९८५-८६

* शंकरराव चव्हाण - १९८६-८८

* शरद पवार - १९९३-९५

* मनोहर जोशी - १९९५-९९

* नारायण राणे - १९९९ अल्पकाळ

* विलासराव देशमुख - १९९९ ते २००३

* सुशीलकुमार शिंदे - २००३-२००४

* विलासराव देशमुख - २००४-२०१०

* अशोक चव्हाण - २००८-२०१०

* पृथ्वीराज चव्हाण - २०१० -२०१५

* देवेंद्र फडणवीस - २०१५ पासून   
 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.