गुरुवार, ३० जून, २०१६

भारत एक झलक

भारत एक झलक 

भारताची राष्ट्रीय प्रतीके - 

* राष्ट्रध्वज -  भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे प्रमाण ३:२ असे आहे. वरून खाली या क्रमाने राष्ट्रध्वजात केशरी, पांढरा, हिरवा या तीन रंगाच्या सारख्या रुंदीच्या आडव्या पट्ट्या आहेत.

* या चक्राला २४ आरे आहेत. हे अशोकचक्र सारनाथ येथील सुप्रसिद्ध सिंहशीर्ष अशोक स्तंभावरील आहे.

* भारताच्या घटनासमितीने २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता दिली.

* राजमुद्रा - भारताची राजमुद्रा ही सारनाथ येथील सिंहशीर्ष अशोक स्तंभाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेत समोरून फक्त तीनच सिंह दिसतात. आणि त्यांच्या खालच्या बाजूस मध्यावर चक्र असून घोडा, बैल, यांच्या प्रतिमा आहेत.

* ही राजमुद्रा भारत सरकारने २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारली.

* राष्ट्रगीत - रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जण गण मण हे राष्ट्रगीत म्हणून २४ जानेवारी १९५० रोजी स्वीकृत केले. हे राष्ट्रगीत म्हणायला ५२ सेकण्ड लागतात.

* राष्ट्रीय गीत - बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतील वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय गाण म्हणून गायले जाते.

* राष्ट्रीय पंचांग - २२ मार्च १९५७ पासून अस्तित्वात असलेले राष्ट्रीय पंचांग हे शक कालगणनेवर आधारित आहे. या पंचांगात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून वर्षाचा प्रारंभ होतो.  ग्रेग्ररियन किंवा खिस्त्री पंचांगाप्रमाणे आहे. २२ मार्च या दिवशी येतो लीप वर्ष असेल तर वर्षाचा प्रारंभ वर्षाच्या २१ मार्च रोजी येतो.

* राष्ट्रीय प्राणी - अंगावर पिवळ्या रंगाची लव व काळे पट्टे असलेला बंगाली वाघ बेंगॉल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. १९७२ पर्यंत सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता.

* राष्ट्रीय पक्षी - मयूर किंवा मोर हा देखणा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर भारताच्या सर्वच भागात आढळून येतो.

* राष्ट्रीय फुल - कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे, कमळ हे भारतीय संस्कृती, पवित्रता, शुद्धता, याचे प्रतीक आहे.

* राष्ट्रीय फळ - आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे कारण हा भारतात सर्वत्र आढळतो, आणि याचा किमान १०० जाती आहेत.

* भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे.

भारत राष्ट्रीय दिनविशेष

* १२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिन

* १५ जानेवारी - भुसेंना दिन

* २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

* ३० जानेवारी - हुतात्मा दिन

* २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

* ५ एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन

* २१ एप्रिल - प्रशासकीय सेवा दिन

* ३ मे - वृत्तपत्र तंत्रज्ञान दिन

* मे महिन्यातील दुसरा रविवार - मातृदिन

* ११ मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

* ३१ मे - तंबाखूविरोधी दिन

* जून महिन्यातील तिसरा रविवार - पितृदिन

* ९ ऑगस्ट - छोडो भारत दिन

* १५ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन

* ५ सप्टेंबर - शिक्षक दिन व संस्कृत दिन

* २६ सप्टेंबर - कर्णबधिर दिन

* ८ ऑकटोम्बर - वायुसेना दिन

* १० ऑकटोबर - राष्ट्रीय टपाल दिन

* १४ नोव्हेंबर - बालदिन

* ४ डिसेंबर - नौसेना दिन

* ७ डिसेंबर -  ध्वजदिन

* १८ डिसेंबर - अल्पसंख्याक दिन

* २३ डिसेंबर - किसान दिन

भारतातील स्मुर्तीस्थळे 

* महात्मा गांधी - राजघाट, दिल्ली

* जवाहरलाल नेहरू - शांतीवन, दिल्ली

* लालबहादूर शास्त्री - विजयघाट, दिल्ली

* इंदिरा गांधी - शक्तिस्थळ, दिल्ली

* चरणसिंग - किसानघाट, दिल्ली

* बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी, मुंबई

* राजीव गांधी - वीरभूमी, दिल्ली

* जगजीवनराम - समतास्थळ, दिल्ली

* मोरारजी देसाई - अभयघाट, अहमदाबाद

* ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ, दिल्ली

* यशवंतराव चव्हाण - कराड, महाराष्ट्र

भारतातील मान्यवरांची टोपणनावे 

* महात्मा - ज्योतिराव फुले, मोहनदास करमचंद गांधी

* लोकमान्य - बाळ गंगाधर टिळक

* स्वातंत्रवीर - विनायक दामोदर सावरकर

* पोलादी पुरुष - सरदार वल्लभभाई पटेल

* नेताजी - शुभाचंद्र बोस

* पंजाब केसरी, शेर ए पंजाब - लाला लजपतराय

* लोकनायक - जयप्रकाश नारायण

* सरहद्द गांधी, बादशहाखान - खान अब्दुल गफार खान

* पंडितजी - जवाहरलाल नेहरू

* महामना - पंडित मदन मोह मालवीय

* आचार्य - विनोबा भावे, प्रा के अत्रे, प्रफुलचंद्र रे

* देशबंधू - चित्तरंजन दास

* आंध्रकेसरी - टी - प्रकाशम

* कर्नाटक केसरी - गंगाधरराव देशपांडे

* महर्षी - विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे, देवेंद्रनाथ टागोर, दयानंद सरस्वती.

* गुरुजी - पांडुरंग सदाशिव गुरुजी, मा. स. गोवळकर

* राष्ट्रपिता - महात्मा गांधी

* भारताचे पितामह - दादाभाई नौरोजी

* राजाजी - सी राजगोपालाचारी

* भारताची नाइटिंगेल - सरोजिनी नायडू

* म्हैसूरचा वाघ - टिपू सुलतान

* दीनबंधू - सी. एफ. अँड्रूज

* क्रांतीसिंह - नाना पाटील

* सेनापती - पांडुरंग महादेव बापट

* विझी - महाराजा ऑफ विजयनगरम

* अण्णा - सी. एन. अण्णादुराई

* चित्रपती - व्ही शांताराम

* कायदे आझम - महंमद अली जिना

* गुरुदेव - रवींद्रनाथ टागोर

* शेर ए काश्मीर - शेख अब्दूलला

* सेंट ऑफ द गटर्स - मदर तेरेसा

भारतातील सर्वात पहिली व्यक्ती 

* स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती - डॉ राजेंद्र प्रसाद

* स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती - डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

* स्वतंत्र भारताचे पंतप्रधान - पं जवाहरलाल नेहरू

* स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान - सरदार वल्लभभाई पटेल

* स्वतंत्र भारताचे गर्व्हनर जनरल - चक्रवर्ती राजगोपालाचारी

* आय सी एस अधिकारी - सत्येंद्रनाथ टागोर

* रिझर्व्ह बँकेचे अधिकारी - चिंतामणराव डी देशमुख

* स्त्री केंद्रीय मंत्री - राजकुमारी अमृत कौर

* स्त्री मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी

* सर्वोच न्यायाधीश स्त्री - एम साहिब फातिमा बीबी

* स्त्री राज्यपाल - सरोजिनी नायडू

* स्त्री पंतप्रधान - इंदिरा गांधी

* लोकसभा सभापती - गणेश वासुदेव उर्फ दादासाहेब मावळंकर

* लोकसभा सभापती स्त्री - सुमित्रा महाजन

* भारतीय राष्ट्रीय स्त्री अध्यक्ष - सरोजिनी नायडू

* नागरी वैमानिक - जे. आर डी टाटा

* स्त्री वैमानिक - दुर्गा बॅनर्जी

* माउंट एव्हरेस्टवर आरोहण करणारा गिर्यारोहक - तेनसिंग नोर्गे

* माउंट एव्हरेस्टवर आरोहण करणारी गिर्यारोहक - बचेंद्री पाल

* स्त्री आय पी एस अधिकारी - किरण बेदी

* मुस्लिम राष्ट्र्पती - डॉ झाकीर हुसेन

* दलित पार्श्वभूमी असलेले - के आर नारायणन

* मिस युनिव्हर्स - सुश्मिता सेन

* मिस वर्ल्ड - रिटा फारिया

* अंटार्तिकावर पदार्पण करणारा - लेफ्टनंट रामचरण

* चित्रपट अभिनेत्री - कमलाबाई गोखले

* वायुदलातील स्त्री वैमानिक - हरिता देओल

* भारतरत्न पूरसाकर मिळवणारी संगीत क्षेत्रातील व्यक्ती - एम एस सुब्बलक्ष्मी

* भारतीय वंशाची अंतराळवीर - कल्पना चावला

* स्त्री व्यंगचित्रकार - मंजुळा पदमनाभन

* महिला उपकुलगुरू - हंसाबेन मेहता

* महिला पदवीधर - कादंबिनी गांगुली व चंद्रमुखी

* ऑस्कर पुरस्कार - भानू अथय्या

* अंतराळवीर - राकेश शर्मा

* फिल्ड मार्शल - जनरल एस एच एफ जे मानेकशहा

* इंग्लिश खाडी पोहून जाणारा - मिहीर सेन

* इंग्लिश खाडी पोहून जाणारी महिला - आरती सहा

* मॅगसेसे पुरस्कार - विनोबा भावे

* टेस्टट्यूब बालक - दुर्गा


 

   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.