सोमवार, २० जून, २०१६

थेट परकीय गुंतवणूक २०१६

थेट परकीय गुंतवणूक २०१६

* केंद्र सरकारने भारतात उद्योग वाढावा यासाठी संरक्षण, नागरी विमान वाहतूक, औषध निर्मिती, पशुपालन इत्यादी क्षेत्रे खुली केली.

* आता या सर्व क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक खुली झाली आहे.

* संरक्षण क्षेत्र, विमान क्षेत्र, औषध क्षेत्र या सर्व क्षेत्रात आता आधुनिक तंत्रज्ञान उपलब्द होऊन भारताला या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल.

* खाद्यपदार्थ व्यापारात १००% टक्के गुंतवणूक, खाद्यपदार्थाची निर्मिती व प्रक्रिया भारतात झाली असेल तर खाद्य पदार्थाच्या ई - व्यापारासाठीही सरकारी परवागीनंतर १००% वाव. यामुळे उपग्रह तसेच दूरस्थ माध्यमाचा सेवेचा लाभ देणारे जाळे, डीटीएच, केबल नेटवर्क, मोबाईल नेटवर्क आदि क्षेत्रामध्ये १००% वाव.

* या थेट परवानगी मंजुरीनंतर भारत आता सर्वात खुली अर्थव्यवस्था असणारा देश झाला आहे, यामुळे भारतातील रोजगार क्षेत्राला वाव मिळेल व रोजगार वाढेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.