शुक्रवार, १० जून, २०१६

माहिती तंत्रज्ञान प्रगतीच्या समस्या

२.११ माहिती तंत्रज्ञान प्रगतीच्या समस्या 

* तंत्रज्ञानामुळे विकासामुळे मानवी जीवनाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मानव हाच उद्योगधंद्याचा केंद्रबिंदू आहे आणि मानवालाच त्या समस्याशी सामना करावा लागत आहे.

* सामाजिक जीवनातील नियंत्रणे नष्ट होत स्वैराचार वाढीस लागत आहे. नीती अनीतीच्या कल्पना - विचारात बदलते प्रवाह निर्माण झालेले आहे.

* अद्यवत व तत्काळ उपलब्द माहितीमुळे वैचारिक शक्ती कमकुवत होत आहे. स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढणारे आहे.

* ज्ञानाच्या कक्षा उंचावत असल्या तरीही संशोधनातील प्रगती कमी - कमी होत आहे. काही ठिकाणी संशोधन कार्य ठप्प झाले आहे.

* पारंपारिक व काल्पनिक जीवन जगण्यात नक्कल करण्याचे प्रमाण वाढत्या स्वरूपाचे आहे.

* सारखेपणा, सुंदरता, विकसित झाली असली तरीही त्यामागची सर्जनता कमी होत आहे.

* शिक्षण - प्रशिक्षण, आचार - विचार, इत्यादी विकासाच्या प्रवाहात अमुलाग्र बदल झाल्याचे अविश्वास, संयम नितीमत्ता इत्यादींना धक्का पोहोचला आहे.

* उद्योगामधील स्वयंचलित यंत्र आणि माहिती तंत्रज्ञान इद्यादीच्या सुखसोई मानवी बळावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेकारीची समस्या वाढत्या स्वरुपाची आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.