सोमवार, २० जून, २०१६

पूरग्रस्त प्रदेश

पूरग्रस्त प्रदेश 

पूरग्रस्त आसाम 

* आसाम राज्याचा ४५% भाग पुराच्या तडाख्याप्रमाणे समाविष्ट होतो. ब्रह्मपुत्रा या लांब नदीच्या जलप्रवाहाखाली विशेषता महापुराच्या वेळी आसामच्या शेतीचे नुकसान होते.

* या राज्यातील दऱ्यासंबंधी २२ जिल्हे आहेत तर बराक नदीखोर्यांचा संबंध ५ जिल्ह्यांशी आहे. आग्नेय मान्सून वाऱ्यापासून या प्रदेशात अतिवृष्टी होते.

* जून २००४ मध्ये आलेल्या पुरामुळे या क्षतिग्रस्त खेडे १०,४२५, प्राणीजीवन विनाश २९,६६६, मानवी हानी २५३, संपूर्ण नष्ट झालेली घरे ५,७२,४१३ हेक्टर, पिकबाधित क्षेत्र १२,४७,८४५ हेक्टर इत्यादी प्रमाणात नुकसान झाले आहे.

खानदेश महापूर 

* खानदेशातील चाळीसगाव परिसरात २०१० साली नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले त्या पुराच्या थैमानाने १ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना प्रचंड पूर आला.

* चोपडा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या रत्नावती नदीला १ सप्टेंबर २०१० रोजी पूर येवून घरे, दुकाने, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

* सातपुड्यात व रावेर तालुक्यात बुधवार २ सप्टेंबर २०१० रोजी रात्री मुसळधार पाऊस होऊन नागझरी नदीला मोठा पूर आला.

* या पुरामुळे नदीकाठावरील १२०० हेक्टरमधील पेरू, कपाशी, केळी, इत्यादी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई महापूर 

* महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचे प्रवेशदार असलेल्या मुंबई महानगराला वेळोवेळी अनेक आपत्तीचा सामना करावा लागतो.

* सन २००६ पासून मुंबई अनेक वेळा पुराच्या तडाख्यात सापडलेली आहे. या जलमय मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरांना या पावसाचा तडाखा बसतो.

* काही तासातच पडलेल्या पावसाने मुंबईकराचे चक्क मुंबई २४ तास बंद होती अशा प्रकारचे हाल झाले. पावसाची २००९ ची स्थिती म्हणजे यात प्रचंड प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाली.

मुंबई बॉम्बहल्ला १९९३

* १९९३ साली लागोपाठ १३ बॉम्बहल्ल्यांनी मुंबईला धक्का देण्याचा प्रकार दहशतवाद्याकडून झाला. १२ मार्च १९९३ शुक्रवार रोजी अत्यंत स्फोटक व शक्तिशाली बॉम्बस्फोटाची मालिका मुंबईवर कोसलळी.

* १२ मार्च १९९३ दुपारी १.३० ते ३.४० दरम्यान हॉटेल्स बँका, इत्यादीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला.

* भूमिगत गुन्हेगारातील जगातील डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाउद इब्राहीमच्या मदतीने मुंबईत बॉम्ब हल्ले करण्यात आले.

* स्मगलर अस्लम भट्टी व दाउद यांनी आपला साथीदार टायगर मेनमनच्या कार्यातून बॉम्बस्फोट घडवून आणले.

* या हल्ल्यात २५७ जण मृत्यूमुखी पडले, तसेच ७१३ झण जखमी झाले, यात वित्तहानी व प्राणहानी मोठ्या प्रमाणत झाली.

* या बॉम्ब हल्ल्यामागे हिंदू व मुस्लिम यांच्यातील संघर्ष, बाबरी मशीद हि प्रमुख कारणे असल्याने मुस्लिम व्यापारी यांच्या व्यवसायावर व इमारतीवर हल्ले चढवण्यात आले.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.